नाशिक

कोविड १९ लसीचा मोफत बुस्टर डोस घेण्याचे मनपाचे आवाहन


  • सहा महिन्यात १ लाख ६४ हजार जणांनी घेतला बुस्टर डोस

दक्ष न्यूज: करणसिंग पवार

नाशिक : शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलै २०२२ पासून नाशिक शहरात १८ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरीकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस मोफत दिला जात आहे. शहरात पात्र असलेल्या १३ लाख ६३ हजार ७०० नागरिकांपैकी १ लाख ६४ हजार ३१६ लाभार्थ्यांनी मोफत बुस्टर डोसचा लाभ घेतला आहे. कोरोनाचे अद्याप संकट शमलेले नाही. त्यामुळे कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा.

नाशिक शहरात १३ लाख ६३ हजार ७०० नागरिक आहेत. त्यापैकी फ्रंट लाईन वर्कर आणि वय वर्ष ६० वरील नागरिकांनी पूर्वीच बुस्टर घेतला होता. १५ जुलै २०२२ पासून १८ वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उर्वरित नागरिक मोफत बूस्टरसाठी पात्र आहेत.

  • मनपाला लसीचा साठा उपलब्ध

नाशिक महानगरपालिकेला कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. नागरिकांनी आपल्या घरा जवळील लसीकरण केंद्रात जाऊन बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.

कोविड १९ लसीकरण केंद्राची नावे

  • कोव्हिशील्ड

पंचवटी
१) मायको पंचवटी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२) मखमलाबाद शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३) नांदूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
४) हिरावाडी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नशिक रोड विभाग

१) नाशिक रोड शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२)दसक पंचक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३)सिन्नर फाटा शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
४)हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय

सातपूर विभाग

१) मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नाशिक पूर्व विभाग

१) वडाळा गाव शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२) भारत नगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३) एस जी एम शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
४) उपनगर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

नाशिक पश्चिम विभाग

१) बारा बंगला शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

सिडको विभाग

१) स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी
२) पिंपळगाव खांब शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
३) सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र

  • कोव्हॅक्सिन

१) रेड क्रॉस शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
२) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय
३) झाकीर हुसेन रुग्णालय
४)मायको सातपूर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र
५)सिडको शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *