रविवारी पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा
दक्ष न्यूज : प्रतिनिधी गणेश केदारे
मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे २२ जानेवारी रोजी मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान व जेष्ठ पत्रकारांना जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जेष्ठ पत्रकार भास्कर कदम, नरेश गुजराथी, अशोक परदेशी, मारुती जगधने, जगनराव पाटील, सतीश शेकदार यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा मनमाडला रविवार दि. २२ जानेवारी रोजी दुपारी ११ वाजता पल्लवी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे, झी २४ तासच्या अँकर मधुरा सराफ, लोकशाही न्यूजचे अँकर विशाल पाटील, सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ राहुल रनाळकर, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक शैलेंद्र तनपुरे, दिव्य मराठीचे संपादक जयप्रकाश पवार, पुण्यनगरीचे संपादक किरण लोखंडे, लोकमतचे संपादक मिलिंद कुलकर्णी, पुढारीचे संपादक प्रताप जाधव, आपलं महानगरचे संपादक हेमंत भोसले, लोकसत्ताचे संपादक अविनाश पाटील, दि नाशिक हेरॉल्डचे संपादक मिलिंद सजगुरे, देशदूतच्या संपादिका डॉ वैशाली बालाजीवाले, सामनाचे निवासी संपादक बाबासाहेब गायकवाड, झी २४ तासचे सिनियर करस्पॉंडंड योगेश खरे, एबीपी माझाचे ब्युरो चीफ मुकुल कुलकर्णी, टीव्ही ९ मराठीचे उ. म. ब्युरो चीफ चंदन पुजाधिकारी, मराठी न्यूज नेशनचे ब्युरो चीफ गणेश सावंत, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह रजपूत, नाशिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संपत देवगिरे, नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य मोतीराम पिंगळे, नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास चंद्रात्रे आदींसह इतर मान्यवरांच मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमात नांदगाव तालुक्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात येणार आहे. तर साप्ता. मनमाड ठिणगीचे संस्थापक संपादक, जेष्ठ पत्रकार (स्व.) प्रकाश गोयल यांच्या स्मरणार्थ ठिणगी परिवाराच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा जेष्ठ पत्रकार भास्कर कदम (नांदगाव), जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी (मनमाड), जेष्ठ पत्रकार अशोक परदेशी (मनमाड), जेष्ठ पत्रकार मारुती जगधने (नांदगांव), जेष्ठ पत्रकार जगनराव पाटील (न्यायडोंगरी), जेष्ठ पत्रकार सतीश शेकदार (मनमाड) यांची निवड करण्यात आली आहे.
सन्मानचिन्ह, मानपत्र, महावस्त्र, पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तर दै जनश्रद्धा वृत्तपत्रातर्फे संस्थापक संपादक (स्व) कांतीलाल गुजराथी व ज्येष्ठ पत्रकार शकुंतला गुजराथी यांच्या स्मरणार्थ नांदगाव तालुक्यातील प्रिंट व दृकश्राव्य माध्यमातील पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्पर्धेत निवडलेल्या पत्रकारांना उत्कृष्ट बातमी , सामाजिक बातमी, समस्या प्रधान बातमी, उल्लेखनीय साप्ताहिक बातमी, ह्युमन स्टोरी ,उत्कृष्ट पोर्टल बातमी, उत्कृष्ट फोटोग्राफी ,न्यूज चॅनल उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष अमोल खरे यांनी दिली.