पावसाळा पुर्वी ड्रेनेज व बांधकाम विभागातील कामांचा महापौर सतीश कुलकर्णी यांनी घेतला आढावा


नाशिक: प्रतिनिधी

यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सुनची सुरवात लवकरच असल्याचे वर्तविण्यात आल्यानुसार मागील महीन्यात पावसाळा पुर्व कामांबाबत आढावा बैठक घेण्यात आली होती त्याअनुशंगाने पावसाळापुर्व झालेल्या कामांचा आढावा घेणेसाठी दि.8/6/2021 रोजी ड्रेनेज व बांधकाम विभागाच्या कामांचा प्रगती आढावा मा.महापौर श्री सतिश नाना कुलकर्णी यांनी घेतला सदर बैठकीत शहरातील विविध सखल भागात पावसाचे पाणी साचु नये त्याचा योग्य पध्दतीने निचरा होणे कामी नियोजन करणे, नाल्यांची सफाई योग्य रीतीने होत आहे की नाही याचा खुलासा जाणुन घेउन नागरीकांच्या तक्रारी प्राप्त्‍ होणार नाही अशा पध्दतीने कामकाज झाले पाहीजे असा आदेश संबधीत खाते प्रमुख व त्या त्या विभागातील कार्यकारी व उप-अभियंता यांना देण्यात आल्या. याप्रसंगी शहर अभियंता यांनी शहरातील मोठया नाल्यांची साफ सफाईचे कामकाज आजपर्यंत नाले सफाई बाबत 80 टक्के काम होत आले असुन उर्वरीत कामकाज येत्या काही दिवसात पुर्ण होणार असल्याची माहीती मा.महापौरांना बैठकी प्रसंगी दिली त्या अनुशंगाने पावसाळा सुरु होणे पुर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई होणे बाबत यंत्रणा राबवावी व तसे नियोजन करावे व याबाबत शहरातील कोणत्याही विभागातुन पाणी साठल्याच्या तक्रारी येणार नाही याची दखल घ्यावी असे मा महापौर श्री सतिश नाना कुलकर्णी यांनी सांगितले.

याच प्रसंगी भुयारी गटार योजनेचे कामकाजा संबधीची माहीती घेतांना संबधीत विभागाचे अधिक्षक अभियंता श्री नलावडे यांनी सांगितले की विभागाकडे एक रोबोट मशिन मोठे नाले व नदी सफाई साठी उपलब्ध असुन शहराची गरज लक्षात घेता नव्याने दोन रोबेाट मशिन घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याकरीता सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात नव्याने दोन रोबोट मशिन खरेदी करणेसाठी र.रु.10 कोटींची तरतुद धरणार असुन र.रु.25 कोटी नव्याने पावासाळी गटारी साठी तरतुद धरणेत येणार असल्याचे मा.महापौर श्री सतिश नाना कुलकर्णी यांनी सांगितले. पुढील काळात पावसाळयात शहरातील ज्या ज्या भागात पाणी साचुन समस्या निर्माण होतील त्याचा अभ्यास करुन पुढील पावसाळयापुर्वी त्यावर तोडगा काढुन सदर भागात पुन्हा पाणी साठणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश संबधित विभागास देण्यात आले.

सदर बैठकीस शहर अभियंता श्री संजय घुगे, अधिक्षक अभियंता भुगयो श्री संदीप नलावडे,कार्यकारी अभियंता श्री यु डी धर्माधिकार, श्री वंजारी,श्री आर एस पाटील, श्री बच्छाव व संबधित विभागाचे उप अभियंता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *