किरकोळ स्वरूपाचे राजकीय- सामाजिक गुन्हे मागे घेणार पोलीस आयुक्तांचे शिवसेना शिष्टमंडळास आश्वासन


नाशिक: प्रतिनिधी

नाशिक आयुक्तालय क्षेत्रातील ज्या व्यक्तींवर राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे किरकोळ गुन्हे असतील त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तापासून त्यांच्यावरील ते गुन्हे मागे घ्यावेत आणि त्यांना दिलासा द्यावा,अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे केली असता आयुक्तांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत ते गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

सामाजिक व राजकीय स्वरूपाचे किरकोळ गुन्हे दाखल असलेल्या नागरिकाना पोलीस आयुक्तालयातर्फे सातत्याने नोटिसा बजाविल्या जात असल्याने नोटीस बजावलेल्या व्याक्तीच्या कृंटबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.कोरोनाच्या काळात हाताला काम नसल्याने सदर कुटुंबावरील पहीलेच मानसिक दडपण असल्याचे शिवसेना उपनेते माजीमंत्री बबनराव घोलप तसेच बडगुजर यांनी आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले असता साधकबाधक चर्चेनंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ज्या लोकांना नोटिसा काढल्या त्यांना सुधारण्याची एक संधी देण्यासाठी अशा लोकांचे विभागनिहाय मेळावे आयोजित करून त्या त्या भागातील नागरिकांची मते जाणून घेण्यात येतील.त्यांचे उपजीविकेचे साधन काय,ते काय काम करतात हे तपासले जाईल.नागरिकांकडून जर त्याबाबत चांगला अभिप्राय आल्यास अशा लोकांना सुधारण्याची एक संधी निश्चितच दिली जाईल,असे आश्वासन पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी शिवसेना शिष्टमंडळास दिल्याचे बडगुजर यांनी शेवटी सांगितले.

शिष्टमंडळात विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते,माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल,दता गायकवाड माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे,माजी शिक्षण मंडळ उप सभापती राजेंद्र देसाई,युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे आदींचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *