महापालिका निवडणुकीसाठी सर्व युवक पदाधिकाऱ्यानी सज्ज व्हा – अंबादास खैरे
नाशिक: करणसिंग पवार
आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्व युवक पदाधिकाऱ्यानी तयारी सुरु करण्याच्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम घेण्याच्या सूचना देत राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळत राष्ट्रवादी भवन येथे ५० टक्के युवक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. यावेळी युवक पदाधिकारी कै.शिवराज (सनी) ओबेरॉय यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी तसेच १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापनदिन असून यानिमित्ताने शहरात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे बैठक घेण्यात आली. जवळपास दीड वर्षापासून कोरोना महामारीने देशात थैमान घातले असून नाशिक मध्ये रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत होती. सद्यस्थितीत कोरोनाला आळा घालण्यात सर्वांना यश प्राप्त होत असून जनजीवन पूर्ववत होत आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात असल्यास आगामी महानगरपालिका निवडणुक वेळेत होण्याची शक्यता असल्याने महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी त्याची रूपरेषा मांडण्यासाठी युवक राष्ट्रवादीची आढावा बैठक घेण्यात आली होती.
कोरोना काळात युवक पदाधिकाऱ्यानी जनहितार्थ अनेक कामे केली असून ती कामे जनतेसमोर पोहचवून कामाचे मतात परिवर्तन करावे, त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ १.१ किलोमीटर स्मार्ट सिटीचा रस्ता बनविण्यात जवळपास तीन वर्षाचा कालावधी व १७ कोटीहून अधिक खर्च लागला. आता गर्दीच्या ठिकाणीचे रस्ते स्मार्ट सिटी कंपनीने खोदण्यास सुरवात केली असून यास किती कालावधी लागेल याचे उत्तर स्मार्ट सिटी कंपनी कडे नाही. शहरातील विविध भागातील रस्ते विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आले परंतु ते तसेच सोडून दिले असून पावसाळ्यात मातीमुळे पुन्हा खड्डे होणार आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी असल्याने जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन करावे. अशी सूचना यावेळी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पदाधिकाऱ्याना दिली. जनतेच्या हितासाठी केलेल्या कामांची प्रसिद्धी करण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करावा. तसेच प्रत्येक १५ दिवसांनी आढावा बैठक होणार असल्याची सूचना यावेळी खैरे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत युवकांना संधी उपलब्ध होणार आहे. परंतु जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपले काम जनतेपर्यंत पोहचवून आपले नावलौकिक वाढवेल व बूथ कमिटी तयार करेल त्यालाच पक्ष संधी देण्यार असल्याचे संकेत यावेळी शहराध्यक्ष खैरे यांनी दिले.
याप्रसंगी जय कोतवाल, नितीन निगळ, राहुल तुपे, सोनू वायकर, विशाल डोखे,निलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, डॉ.संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष भुजबळ, नवराज रामराजे, रेहान शेख, हर्शल चव्हाण, विशाल माळेकर, अविनाश मालुंजकर, अमोल सूर्यवंशी, प्रश्नांत नवले, संतोष गोवर्धने, कुणाल धस्ते, गणेश खोडे, चेतन दुखे, स्वराज हाके, अजय बागुल, सचिन मोगल, मिलिंद सोळंकी, गणेश गरगटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.