नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचा ३२ वा वर्धापनदिन रन ऑफ वाॅक ने साजरा
दक्ष न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेला ३२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पोलिस कवायत मैदानावर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रन ऑफ वाॅकचे आयोजन केले होते.

रन ऑफ वाॅक सुरू होण्यापूर्वी उपस्थित अधिकारी आणि अंमलदार यांचा पंचवटीतील जिम ट्रेनर व झुंबा मार्गदर्शक करणसिंग यांनी वाॅर्मअप करून घेतला. त्यानंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी रन ऑफ वाॅक ला फ्लॅग दाखवल्यावर पोलिस कवायत मैदानापासून सकाळी ६ ला रन ऑफ वाॅक ला प्रारंभ झाला.
गंगापूर रोड, जुना गंगापूर नाका, कॅनडा काॅर्नर , जुने पोलिस आयुक्त कार्यालय, शरणपूर सिग्नल, मायको सर्कल, सिव्हिल हाॅस्पिटल, त्रंबक नाका, सीबीएस, अशोक स्तंभ, आणि पुन्हा पोलिस कवायत मैदानावर येऊन रन ऑफ वाॅक चा समारोप झाला. या उपक्रमात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे , पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत मोरे, भुसारे, गंगाधर सोनवणे, श्रीमती दीपाली खन्ना, सोहेल शेख, सिध्देश्वर थुमाळ तसेच सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी ,अंमलदार यांनी भाग घेतला.