व्हाॅटस्अ‍ॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅपचे नवीन फिचर्स; युजर्सचा होणार हा 👇फायदा


दक्ष न्यूज : विशेष प्रतिनिधी

मुंबई : व्हाॅटस् अ‍ॅपकडून आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फिचर्स सादर केली जातात. व्हॉट्स अ‍ॅपची मालकी असलेल्या ‘मेटा’ कंपनीचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी नुकतीच नव्या फिचर्सची घोषणा केली.

  • ‘व्हॉट्स अ‍ॅप’मधील नवीन फीचर्स

मार्क झुकरबर्ग यांनी जाहीर केल्यानुसार, व्हाॅट्स अ‍ॅपच्या एका ग्रुपमध्ये आता तब्बल 1024 सदस्य जोडता येणार आहेत. तसेच, व्हॉट्स अ‍ॅपच्या व्हिडिओ कॉलवर आता एकाच वेळी 32 जणांना सहभागी होता येणार आहे. आतापर्यंत फक्त 8 जणांना काॅलमध्ये सहभागी होता येत होते.

  • महत्वाचा बदल

व्हॉट्स अ‍ॅपवर आता युजर्संना 2 जीबीपर्यंत फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करता येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

  • इन-चॅट पोल

तसेच व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपमध्ये ‘इन-चॅट पोल’देखील घेता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्रुपमधील सदस्य एखाद्या प्रश्नावर आपले मत नोंदवू शकतात. व्हॉट्स अ‍ॅपचे हे फीचर कसं दिसेल, तसेच त्याच्या कार्यक्षमतेबाबत कंपनीने अद्याप कोणताही माहिती दिलेली नाही. मात्र, नवीन फीचर्सचा अनुभव घेण्यासाठी युजर्संना व्हॉट्स अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *