एक हात मदतीचा; कर्तव्यदक्ष पंचवटी पोलिसांना सॅनिटाईजर व मास्कचे वाटप


नाशिक: प्रतिनिधी

कोरोना या महामारीने जगात थैमान घातले आहे, या महामारीला लढा देण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व पोलिस बांधव हे गेल्या वर्षभरापासून धजत आहेत, नाशिक शहरातील पंचवटी पोलिस स्टेशनचे कर्मचारी हे आपले काम नित्य नेमाने बजावत आहे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी जपत आमदार राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आर. डी. युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण भाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सॅनिटाईजरच्या ५ लिटरच्या २० कॅन व ५०० मास्क हे पंचवटी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अशोक भगत यांच्याकडे व सुपूर्द करण्यात आले, यावेळी अशोक भगत यानी या उपक्रमाचे कौतुक केले व प्रविण भाटेंना वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. याचवेळी अशोक भगत यांना ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विक्रांत युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष शंभु बागुल हेही उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास शेखर फरताळे, दिपक चव्हाण, चंद्रकांत कोळावणे, राहुल गावंड, सागर जाधव, सुभाष चव्हाण, राहुल आर ससाणे, राहुल एम ससाणे, विनोद कानडे, गणेश मोरकर, नितीन मोरे, अमित चंनाग्राम, प्रतिक संगमनेरे, अविनाश भाटे, लखन कासारे आदींसह मित्र परिवार उपस्थित होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *