डॉ. सिताराम कोल्हे राष्ट्रपती पदकाने सन्मानित


दक्ष न्यूज : करणसिंग बावरी

मुंबई : डॉ.सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस स्टेशन नाशिक शहर यांना १५ ऑगस्ट २०२० रोजी प् स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर माननिय राष्ट्रपती महोदय यांचें गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. सन २०२० व २०२१ मध्ये कोरोना साथीमुळे पदक अंलकरण समारोह आयोजित करण्यात आलेला नव्हता.

दिनांक १३/१०/२०२२ रोजी राजभवन मुंबई येथे माननिय राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते १५/०८/२०२० व २६/०१/२०२१ रोजी जाहीर करण्यात आलेल्या सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती महोदय यांची पोलीस पदके देऊन सन्मानित करण्यात आले.यामध्ये पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ.सिताराम कोल्हे यांची सन १९९१ साली राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली होती. सन १९९२-९३ मध्ये नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमी मधुन एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षण पूर्ण केले नंतर त्यांनी लोहमार्ग नागपूर, नाशिक ग्रामीण विशेष सुरक्षा पथक, जळगाव, गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक आणि सध्या नाशिक शहर येथे कार्यरत आहेत.

त्यांना आजपर्यंत ३० वर्षाचे सेवा कालावधी मध्ये अतिशय क्लिष्ट, किचकट असे खून,दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणून त्यामधील गुन्हेगार अटक करुन कौशल्य पुर्ण तपास केल्याने गुन्हेगार यांना न्यायालयातून शिक्षा लागली आहे. त्यांचे सेवाकलावधी मध्ये आतापर्यंत ७०० + बक्षीसे व १२५ +प्रंशसापत्रे मिळाले आहेत व १ मे २०१६ रोजी त्यांनां गुणवत्ता पुर्ण व उल्लेखनीय सेवेबद्दल माननिय पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. राजभवन येथे अतिशय दिमाखदार सोहळ्याकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननिय एकनाथराव शिंदे,, पोलीस महासंचालक रजनीश सेठ , पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *