आगीच्या घटनेने नाशिक हादरले ! मनमाड मालेगाव रोडवर ऑक्सीजन सिलेंडरने घेतला भेट

दक्ष न्यूज प्रतिनिधी : सचिन पुंडलिक आव्हाड
मालेगाव रोडवरील कानड गावानाजिक ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जाणाऱ्या गाडीचे टायर पंक्चर झाल्याने अपघात झाला असून या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नसून मात्र ऑक्सिजन सिलेंडरणी पेट घेतला.

यावेळी अनेक सिलेंडर अगदी कागदी पुट्टे सारखे हवेत उडत होते. सिलेंडर फुटून लांब लांब उडत होते तर होतेच मात्र त्यांचा विस्फोट झल्याने कर्णक्रकश्य आवाजाही येत होता. घटनास्थळी पोलीस प्रशासन व अग्निश्यमन यंत्रणा देखिल पोहचली होती.

याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित झाला असून नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.