अँँड. रविंद्र पगार यांच्या वाढदिवसा निमित्त ५०० वेपोरायझर मशीनचे वाटप


नाशिक: प्रतिनिधी

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष adv रविंद्र पगार यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाच्या कोविड -१ ९ पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल यांच्या वतीने जिल्ह्यातील शासकीय ग्रामीण स्णालये , प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुकास्तरावरील शासकीय कोविड सेंटर येथे ५०० वेपोरायझर ( वाफ येण्याचे मशीन ) मशीनचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पळसे, पिंपळगाव बसवंत व म्हाळसाकार, बोपेगाव व दिंडोरी, काजीसांगवी, रामेश्वर व वाजगाव खर्डे, सटाणा व नानपूर, नाशिक शहर , झोडगे , दाभाडी व भायगाव मालेगाव येथील शासकीय रूणालये , प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुकास्तरावरील शासकीय कोबिड सेंटर येथे एकूण ५०० वेपोरायझर ( वाफ घेण्याचे मशीन ) मशीनचे वाटप करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी यांनी दिली. यावेळी रविंद्र शिंदे , प्रफुल्ल पवार, अंकुश पाटील आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *