ऑक्सिजन अभावी मृत झालेल्या नागरिकांना ५१ हजार रोपांची लागवड करीत छत्रपती सेनेतर्फे श्रद्धांजली


नाशिक: प्रतिनिधी

राज्यभरात विविध जिल्ह्यांत छत्रपती सेनेतर्फे सुमारे ५१ हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून कोरोना काळात ऑक्सिजन अभावी मृत्यू पावलेल्या रुग्णांना सेनेतर्फे अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी दिली.

मनुष्य जीवनात ऑक्सिजनचे काय महत्त्व असते, याची जाणीव कोरोनाने काही दिवसांत प्रत्येकाला करून दिली. ऑक्सिजन अभावी शहर, जिल्ह्यासह राज्यातील अनेक ठिकाणी कोरोना उपचारादरम्यान अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. त्या कुटुंबाची उणीव आपण भरून काढू शकत नाही. मात्र, भविष्यात प्रत्येकास ऑक्सिजन पुरविणाऱ्या वृक्षांची जाणीव व्हावी, यासाठी छत्रपती सेनेतर्फे राज्याच्या २३ जिल्ह्यांत सुमारे ५१ हजार वृक्षारोपण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे. शहरासह जिल्ह्यात पाच ते दहा हजार वृक्षारोपण करण्याचा मानस कार्याध्यक्ष निलेश शेलार – यांनी व्यक्त केला आहे. पावसाळ्यातील तीन महिने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या रोप लागवडीची प्राथमिक सुरवात म्हणून शहरातील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सिडकोतील अयोध्या मार्केटमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *