धुळे शहरातील खूनाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी
दक्ष न्यूज : अमित कबाडे
नाशिक : धुळे शहरातील जावेद शेख या व्यक्तीचा खून मे महिन्यात झाला. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. मात्र या प्रकरणी खूनातील मुख्य आरोपींना अटक न करता अंबिका नगर मधील रेहाना बी शेख पिंजारी या महिलेचा मुलगा शोएब शेख पिंजारीला पोलिसांनी अटक केली.

मानव अधिकार सहाय्यता संघाने या तपासाबाबत शंका घेतली असून हा तपास सीबीआयकडे किंवा एलसीबी कडे द्यावा अशी मागणी केली आहे. तसे निवेदन मानवता अधिकार सहायता संघाच्या वतीने नाशिक परीक्षेञ पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आले.

याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तथा कोअर समिती सदस्य सुखदेव भालेराव, उत्तर महाराष्ट्र सचिव सुनील मगर, नाशिक शहर अध्यक्ष शहा फैयाज अहमद अब्बास, धुळे जिल्हा अध्यक्ष सोपान देसले, शेरू पिंजारी, इमरान शेरू पिंजारी, रेहाना पिंजारी ,निशा पिंजारी आदी उपस्थित होते.