क्राईमदेशनाशिकमहाराष्ट्र

कायदा मोडीत ‘ लेव्हल्स ‘ ने केली स्वतःची लेव्हल


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

  • नाशिक शहर पोलिस आयुक्त ‘ लेव्हल्स ‘ वर करणार का कारवाई ?

नाशिक : नाशिक शहरात सध्या पबच्या नावाखाली सर्रासपणे डान्सबार सारखे कृत्य सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक देवाणघेवाण करून आपला धंदा सुरू ठेवण्याचा कार्यक्रम सध्या शहरातील अनेक नामांकित हॉटेल मध्ये सुरू आहेत. Levels’ is the Levels pub

मुंबई ठाण्यात डान्सबारच्या नावाखाली अनेक व्यवसाय सुरू झाले तेव्हा कट्टर शिवसैनिक सद्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह डान्सबार धाड टाकून तो बंद केला. धर्मवीर चित्रपटात ती हकीगत सर्वांसमोर आली आहे. त्याची आठवण यायचे कारण म्हणजे ते शिंदे आज मुख्यमंत्री आहेत .आणि खेद अशासाठी की ,ठाण्याचे ठाऊक नाही, नाशकात मात्र सातपूर आयटीआय सिग्नल जवळ हॉटेल लेव्हल्स पब सर्व नियमांची पायमल्ली करून चालवला जात आहे.

डीजे पार्टीच्या नावाखाली येथे अवैध प्रकार चालतात. पब मध्ये नशा केलेली पोरं हॉटेल बाहेर येऊन धिंगाणा घालतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेडछाड करतात. मारामाऱ्या करतात. दक्ष न्यूजने यापूर्वी ही वार्ता प्रसारित करून संबंधितांचे लक्ष वेधलं होतं. परंतु आजही हा पब व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे कोणाकोणाच्या ‘लेव्हल्स ‘या लेव्हल्स पब मार्फत जोडल्या गेल्या आहेत हा प्रश्न उभा राहिला आहे.

त्यात राजकारणी आहेत की पोलीस आहे त की आणखी कोणी ? असा सवाल उपस्थित होते आहे. ठाण्यात ‘शिंदे शाही’ बाणा दाखवला गेला. त्याची आठवण ठेवून नाशिकच्या पोलिसांनी कायद्याचा पालन न करणारा लेव्हल्स पब बंद करावा एवढीच दक्ष न्यूज ची माफक अपेक्षा आहे. Levels’ is the Levels pub

  • नामांकित हॉटेल ‘दक्ष’च्या रडारवर

दक्ष न्यूज पुढील काही दिवसांमध्ये नाशिक शहरातील अनेक अवैध धंद्यांना वाचा फोडणार असून शहरातील नामांकित हॉटेलमध्ये पडद्याआड कोणते कार्यक्रम सुरू आहेत याचा पर्दाफाश करणार आहे.

  • गृहमंत्री व मुख्यमंत्री ना देणार पुरावे

सातपूर आयटीआय सिग्नल जवळ हॉटेल लेव्हल्स पब सर्व नियमांची पायमल्ली करून चालवला जात आहे. या बाबतचे सर्व पुरावे गृहमंत्री, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी तसेच पोलीस महासंचालक व पोलीस आयुक्त यांना देणार आहेत.

सर्वसामान्यांना कोणताही कार्यक्रम असो तर बंधने असतात परंतु या अवैध कृत्य करणाऱ्या ….. कोणतेच बंधन नाही हा एकतर्फी न्याय का? युवक वर्गाची आर्थिक लूट करून त्यांना देशोधडीला लावणारे नामांकित हॉटेलमध्ये असे काम सुरू आहे याला चाप बसणे अत्यंत गरजेचे झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *