नाशिक स्मार्ट सिटीला Smart & Successful Pandemic Recovery Award पुरस्कार

दक्ष न्यूज प्रतिनिधी : सचिन पुंडलिक आव्हाड
स्मार्ट सिटी कौन्सिल इंडिया आणि राज्य शासनाच्या सहकार्याने मुंबई येथे दिनांक. २६/०८/२०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 7 व्या स्मार्ट अर्बनाइजेशन परिषदेत नाशिक महापालिकेच्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडला Smart & Successful Pandemic Recovery Award या प्रकारात पुरस्कार देण्यात आला. संजीवनी या ऍप्लिकेशनच्या प्रभावी व यशस्वी वापरासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय स्मार्ट अर्बनाइजेशन परिषदेत नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी स्मार्ट सिटी मिशनतंर्गत महाराष्ट्राच्या कामगिरीची, तसेच सरकारच्या वतीने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडिया ही संस्था केंद्राच्या स्मार्ट सिटीज मिशनसोबत काम करत असून, या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी स्मार्ट सिटी विशेष प्रकल्प पुरस्कार देण्यात येतात. या वेळी ऑस्ट्रेलियास्थित एलव्हीएक्स ग्लोबल या कंपनीचे अध्यक्ष कोरी ग्रे उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशातील इतर स्मार्ट सिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, विविध प्रकल्प सल्लागार या वेळी उपस्थित होते.

भारत भरातून सर्व स्मार्ट शहरांकडून या पुरस्कारासाठी नामांकन अर्ज मागविण्यात आले होते. यामध्ये नाशिक स्मार्ट सिटी ने कोविड काळात संजीवनी ॲप बनवून त्या माध्यमातून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, हेल्थ असेसमेंट सर्व्हे, कॉमोर्बिडीटी सर्वेक्षण करण्याबाबत कामकाज पाहिले. त्यामुळे अंदाजे १३ लक्ष नागरिकांच्या सर्व्हे च्या माध्यमातून कोविड नियंत्रणाचे काम करण्यास सहाय्य झाले. नाशिक स्मार्ट सिटी च्या वतीने सदर पुरस्कार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख अनिल तडकोड यांनी सदर पुरस्कार स्वीकारला.