महाराष्ट्र

शिंदे गटाचे ९ व भाजपचे ९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ


  • ९ ऑगस्ट क्रांती दिनी मंत्रिमंडळ विस्तार, शिंदे गटाचे ९ मंत्री, भाजपचे ९ मंत्री शिंदे – फडणवीस सरकारचे नऊ नऊ चा फॉर्म्युला

दक्ष न्यूज : करणसिंग बावरी

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. 9 MLAs from the Shinde group and 9 from the BJP took oath as ministers

शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

तर भाजपकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.

तब्बल 40 दिवसानंतर शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला .राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या उपस्थितीत दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळा संपन्न झाला.

या मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यासाठी आस लावून बसलेले शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचा पत्ता कट झाला .मात्र गंभीर आरोप असलेले अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. विशेष म्हणजे भाजप व शिंदे गटाकडून, एकही महिलेचा मंत्रिमंडळात समावेश झालेला नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *