कामगारांचा कंपनीवर डल्ला ; महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील चोरीचा गुन्हा उघड


दक्ष न्यूज प्रतिनिधी : सचिन पुंडलिक आव्हाड

सातपुर औद्योगिक वसाहतीतील महींद्रा ॲण्ड महींद्रा या कंपनीच्यानाशिक प्लॉन्ट मधुन गेल्या महिन्याभरापुर्वी सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचे व्हेरीटो चारचाकी गाडीच्या इंजीनचे तीनशेहून अधिक फ्युअल इंजेक्टर पार्ट कंपनीत कामासाठी येणारे कॉन्ट्रक्टचे कर्मचारी यांचे पैकी कोणीतरी चोरले असल्याबाबत कंपनीचे व्यवस्थापक प्रभाकर जाधव यांनी सातपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महिंद्राअँड महिंद्रा कंपनीतुन सुमारे साडेचार लाख रुपये किंमतीचे फ्युअल इंजेक्ट पार्ट चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना गुन्हेशाखा युनिट क्र . १ नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलिस नाईक प्रशांत मरकड यांना सदरचा गुन्हा करणारे संशयीत आरोपींबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती .त्यावरुन मरकड यांनी सदरची बातमी पोलिस निरिक्षक विजय ढमाळ यांना कळविली .

पो . नि . विजय ढमाळ यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे खात्री करून संशयीतास ताब्यात घेणे कामी पोलीस अंमलदार सपोउनिरी . रविद्र बागुल , प्रविण वाघमारे , शरद सोनवणे , नाझीम पठाण , प्रदिप म्हसदे , प्रशांत मरकड , विशाल देवरे , महेश साळुंके अशांना तात्काळ खाना केले होते . नमुद पथकातील पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या बातमी अनुषंगाने गजानन रामभाऊ भालेराव( वय २ ९ रा . प्रबुध्द नगर , सातपुर ) सिध्दार्थ उमाजी नरवडे( वय २ ९ रा . प्रबुद्ध नगर सातपुर) आकाश बाळु साळवे (वय -२६ वर्षे रा . महीरावणी ) यांचा सातपुर परिसरात शोध घेवून त्यांना शिताफीने पकडुन ताब्यात घेण्यात आले . त्यांना विचारपुस करता त्यांनी चोरलेले सुमारे साडेचार रूपये किंमतीचे ३०० नग फ्युअल इंजेक्टर पार्ट हे अंबड लिंक रोड वरील भंगार विक्रेता अताउल्ला समशुल्ला खान( वय – ४६ रा . मिल्लत नगर , वडाळा) यांना विक्री केल्याचे सांगीतल्याने त्याचे कडुन १०० टक्के फ्युअल इंजेक्टर पार्ट हस्तगत करण्यात आले असुन वरील इसम हे महींद्रा अॅण्ड महींद्रा या कंपनीतच कॉन्ट्रक्ट बेसवर काम करणारे कर्मचारी असल्याचे व त्यांनी गेल्या १०/१२ दिवसात वेळोवेळी सदरचे फ्युअल इंजेक्टर पार्ट चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे .

याप्रकरणातील सर्व संशयीतांना ताब्यात घेवून त्यांना अटक करण्यात आली असुन त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना पुढिल चौकशीसाठी पोलिस कस्टडी ठेवण्याचे आदेश दिले असून आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास गुन्हेशाखेचे युनिट क्र . १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ , रव्रिद्र बागुल , प्रविण वाघमारे , शरद सोनवणे , प्रदिप म्हसदे , प्रशांत मरकड , विशाल देवरे , महेश साळुंके अशांनी संयुक्तरित्या करीत आहेत .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *