मैत्री दिनाच्या दक्ष न्यूज परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा

दक्ष न्यूज प्रतिनिधी : पल्लवी भावसार
मैत्री दिन हे अत्यंत निर्मळ निखळ नातं आहे. त्याला कोणत्याही साक्षी पुराव्याची गरज भासत नाही .मित्र मैत्रिणी समोर आपण आपल्या मनातील साचलेल्या सुखदुःखाचा निचरा करू शकतो .या मैत्रीविषयी आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे जागतिक मैत्री दिन म्हणजेच इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे .आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रेंडशिप डे ची सुरुवात 1958 मध्ये झाली.
जॉय हॉल नावाच्या व्यक्तीचा हॉलमार्क कार्डसचा व्यवसाय होता .लोकांनी फ्रेंडशिप डे साजरा करावा, आणि आपल्या मैत्रीच्या नात्याचा पिळ घट्ट करावा, अशी त्याची इच्छा होती .त्यातूनच त्याने फ्रेंडशिप डे साजरा करायला सुरुवात केली. युनायटेड नेशन्स ने 2011 मध्ये आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा दिवस फ्रेंडशिप डे साजरा करायची घोषणा केली.
जागतिक स्तरावर 30 जुलैला फ्रेंडशिप डे साजरा केला जात असला तरी भारतात ऑगस्टच्या पहिल्या सप्ताहातल्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा होतो .तसं पाहिलं तर भारतात मैत्री जपण्याची आणि मैत्रीला जागण्याची प्राचीन परंपरा आहे .श्रीकृष्ण सुदामा हे उत्कृष्ट उदाहरण. सुदामाला गरिबीचा तिरस्कार नव्हता .श्री श्रीकृष्णाला श्रीमंतीचा गर्व नव्हता. बालपणाची निखळ मैत्री दोघांनी आयुष्यभर जपली. सुदाम्याने श्रीकृष्णाजवळ काही मागितले नाही. श्रीकृष्णाने त्याला न मागता देऊन टाकले. त्या उलट द्रोणाचार्य बालपणीच्या बालपणीचा मित्र राजा झाला तेव्हा तो आपल्याला मदत करेल ,या अपेक्षेने राजा द्रुपदाला भेटायला गेले, आणि द्रुपदाने त्यांचा अपमान करून हाकलून लावले. ही मैत्री पुढे दुश्मनीत बदलली. निरपेक्ष मैत्रीचे दाखले फार कमी आहेत. अपेक्षा वाढल्या की मैत्रीत कटूता येते .हल्ली दारू पाजायला नकार दिला म्हणून मैत्री विसरून एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत मजल गेल्याची उदाहरणे आहेत .
राजकारणातही निखळ मैत्रीची उदाहरणे बरीच कमी आहेत. मैत्रीचे रंग गरजेनुसार सोयीनुसार बदलले जातात. अपवाद बाळासाहेब ठाकरे शरद पवार मैत्रीचा. मतभेद भरपूर होते. पण ते मैत्रीच्या आड आले नाहीत. सुप्रिया सुळे प्रथम खासदार पदासाठी उभे राहिल्या, त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसेनेचा आपला उमेदवार उभा केला नाही. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची मैत्री युती होती, तोपर्यंत टिकली. सत्तेमुळे मैत्री टिकली. आणि सत्ता गेल्यामुळे गेली .अशी अनेक उदाहरणे आहेत. शेवटचे उदाहरण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या मैत्रीबद्दल .सोशल मीडियावर त्यांच्या मैत्रीबद्दल गमतीदार प्रतिक्रिया उपलब्ध आहेत .संजय राऊत यांच्या मैत्रीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील 40 आमदार सोडले. वर्षा बंगला सोडला .मुख्यमंत्रीपद सोडले. पण मैत्री सोडली नाही. याला म्हणतात मैत्री. असो हा गमतीदार भाग सोडा . आयुष्यात प्रत्येकाला मित्र हवेच सुखदुःखासाठी आनंदासाठी म्हणूनच आजच्या मैत्रीदिनानिमित्त दक्ष न्यूज परिवारातर्फे दक्ष न्यूज ला मित्रत्वाने जोडले गेलेल्या सर्वांना मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा