मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांचा राज्यभर दौरा


दक्ष न्यूज : पल्लवी भावसार

  • मुख्यमंत्री नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर जिल्ह्यात जाणार

मुंबई : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिल्यांदाच राज्यभर दौरा होणार आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा 29 तारखेपासून सुरु होत आहे. हा दौरा 31 जुलै पर्यत चालेल . मुख्यमंत्री शिंदे हे मराठावाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात दौरा करणार आहेत.

याबाबत शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री नाशिक, मालेगाव, औरंगाबाद, सिल्लोड, येवला, वैजापूर या भागात स्थानिक पातळीवरचे प्रश्न ऐकून, सर्व घटकातील समस्या आणि निवेदनादेखील स्वीकारणार आहेत.

या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री मालेगाव आणि औरंगाबाद येथे मुक्काम करतील.प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्यासोबत आढावा घेतील. तसेच अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या भागाची देखील पाहणी करतील याचप्रमाणे विकास कामातील आढावा,कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

शिंदेंचा दौरा होणार यावेळी संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर उदय सामंत म्हणाले की, अनेक ठिकाणी शिवसेनेचा मेळावा होणार आहे हा शिंदे गटाचा मेळावा नसेल. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही.

हा दौरा फक्त शिंदे गटातील आमदारांच्या भागात नाही तर पुढे सर्वत्र आहे. कोणत्याही आमदारांच्या भागात विकासकाम केली याचा फायदा महाराष्ट्रालाच होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *