एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील नेतृत्वाच दर्शन; ‘तो’ पूल बांधण्याच्या हालचालींना वेग
- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव ( पुल ) करण्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश
- मंगेश चिवटे तसेच योगेश महस्के यांनी पाहणी करत आढावा घेतला

दक्ष न्यूज प्रतिनिधी : सचिन पुंडलिक आव्हाड
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेला पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी आज सावरपाडा गावातील पुलाच्या ठिकाणी गावकऱ्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समवेत उपस्थितीत पाहणी केली.
माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सदर घटनेची गंभीरपणे दख़ल घेतली असून इथे तात्काळ नव्याने पूल करण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.
सावरपाडा येथील नागरिकांच्या पूल , रस्ते आदी समस्यांची माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी यांनी गंभीरपणे दखल घेतली असून पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असे आश्वासन मंगेश चिवटे यांनी गावकऱ्यांना दिले.तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष चे उत्तर महाराष्ट्र समनव्यक योगेश म्हस्के उपस्थितीत होते