नाशिक रोडला उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा…
दक्ष न्यूज प्रतिनिधी: सचिन पुंडलिक आव्हाड
नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रातील जल कुंभावर पाईप लाईन जोडणीचे काम सुरू केले असल्याने हे काम मोठे असून त्याला विलंब लागणार आहे .
म्हणून नाशिक विभागातील प्रभाग 20 मधील नवले चाळ, विभागीय आयुक्त कार्यालय ,प्रभाग 19 मधील ओढा रोड या परिसरात आज शुक्रवारी पाणीपुरवठा झाला नाही.
तसेच उद्या शनिवार दिनांक 23 जुलै रोजी चा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने पत्रकार द्वारे जाहीर करून नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे