बँक कर्मचाऱ्यानेच लुबाडले शेतकऱ्यांचे दीड कोटी


दक्ष न्यूज : उमेश कापडणीस

देवळा : तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेत रोजंदारीवर काम करणा-या भामट्याने आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन सुमारे एक कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय .संशयित भगवान ज्ञानदेव आहेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय . Bank of Maharashtra

भऊर येथील महाराष्ट्र बँकेत भगवान आहेर हा २०१६ ते ८/७/२०२२ पर्यंत रोजंदारीवर काम करीत होता . त्याने त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन ठेवीदार, खातेदारांचा विश्वास संपादन करून बँकेतील जवळपास ३२ खातेदारांच्या खात्यावरील पीककर्जाच्या रकमेचा अपहार करीत बनावट पावत्या दिल्या . सुमारे एक कोटी ५० लाख ३७ हजार ४५० रूपयांची ही रक्कम बँकेत जमा न करता लुबाडली.

याप्रकरणी मालेगाव येथील बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्रीराम भोर यांनी देवळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.हा आरोपी फरार असून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत, पोलिस निरिक्षक दिलिप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक व्ही आर देवरे व त्यांचे सहकारी अधिक तपास करीत आहेत.सहकारी बँका , पतसंस्थेत आर्थिक अपहाराची सवय लोकांना झाली आहे.

परंतु राष्ट्रीयकृत बँकेत असा अपहार होत असेल तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवावा? असा सवाल विचारला जात आहे. अपहार झालेली रक्कम त्वरीत मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष पंडितराव निकम यांनी केलीय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *