शहरात जमावबंदी लागू …
दक्ष न्यूज : अमित कबाडे
नाशिक : शहरात सातत्याने सुरू असलेली आंदोलने, येणाऱ्या धार्मिक सणांच्या पाश्वभूमिवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने दिनांक १३ जूलै ते २७ जूलैपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र पोलिस कायदा सन १९५१ चे कलम ३७-१-३च्या कलमाद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशात कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड, अथवा शस्त्रे बरोबर नेणे, शस्त्रे , सोटे, भाले, तलवारी, काठ्या,बंदुका आदी वस्तू बरोबर नेणे, प्रतिकात्मक दहन करणे, अर्वाच्य घोषणा देणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन महाआरती करणे, सभा,मिरवणुका आदी प्रकारांने शांतता भंग होणाऱ्या सर्व प्रकारांना मनाई करण्यात आली आहे.