प्रॉपर्टीच्या वादातून अफगाणी सूफी संताची गोळ्या घालून हत्या


  • नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचा पत्रकार परिषदेत मोठा खुलासा
  • आरोपी ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार

दक्ष न्यूज प्रतिनिधी : सचिन पुंडलिक आव्हाड

येवला : येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका अफगाणी सुफी संताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ५ जुलै) संध्याकाळी ही घटना घडली.

मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमाराची ही हत्येची घटना घडली. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून मृत व्यक्ती हा मुस्लिम धर्मगुरू असून, तो मुळचा अफगाणिस्तान येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

दरम्यान पोलीस या मारेकऱ्यांचा शोध घेत आहे. हल्लेखोरांनी हत्येनंतर घटनास्थळावरून पळ काढला. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन भेट देत पाहणी केली. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहे.

येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात झालेल्या अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूच्या हत्येबाबत नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, अफगाणी नागरिक सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून त्यांच्या ड्रायव्हरने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिस्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काल संध्याकाळी येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हा धर्मगुरू मूळचा अफगाणिस्तान येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

सुफी ख्वाजा सय्यद जब चिस्ती असे या अफगाणी सुफी धर्मगुरूचे नाव असून, त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या हत्येबाबत इतरही काही कारण आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

या प्रकरणात एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सुफी धर्मगुरु यांचा ड्राइव्हर आणि इतर तीन जण फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांचे पथक या फरार संशयितांचा शोध घेत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *