पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



नाशिक ( प्रतिनिधी )


फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पोलीस दला विरोधात चिथावणीखोर वक्तव्य आणि पोलीस आयुक्तांचा अपमान करून समाजात पोलिसांबद्दल संतापजनक भावना निर्माण करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी संशयित आरोपी रोहन जयवंत देशपांडे याच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.


पोलिसांबद्दल द्वेष आणि संतापजनक भावना निर्माण केल्याप्रकरणी सदर संशयिताविरोधात माहिती तंत्रज्ञान आणि प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ मे ते २९ मे दरम्यान फेसबुक या सोशल माध्यमाद्वारे पोलीस दल आणि आयुक्तांचा अपमान केला असून समाजात पोलिसांबद्दल संताप निर्माण होण्याच्या हेतूने चिथावणी देत पोलीसदलाची प्रतिमा मलीन केली असून गुन्हेगारांना मदत करण्याच्या हेतूने हे वक्तव्य केले तसेच ते फेसबुक वरून लाईव्ह प्रसारित केले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *