अखिल भारतीय वंजारी युवा संघटन नाशिक जिल्हा पदाधिकारी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.


दक्ष न्यूज प्रतिनिधी : सचिन पुंडलिक आव्हाड

बैठकीला संस्थापक अध्यक्ष श्री.धनराज दादा गुट्टे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.चैत्यन्य भाऊ जायभाये, प्रदेश कार्याध्यक्ष श्री. गजानन भाऊ आंधळे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.रवि आण्णा सानप यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीचे नियोजन श्री.रवि आण्णा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री.अर्जुन भाऊ मुंढे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.प्रसाद भाऊ बोडके व नाशिक जिल्हा पदाधिकारी यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने केले होते. बैठकीची सुरवात राष्ट्रसंत भगवान बाबा व दैवत कै. गोपिनाथराव मुंढे साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी बैठकीचे प्रमुख मार्गदर्शन श्री.धनराज गुट्टे यांनी आपल्या दणकेबाज शैलीमध्ये संघटनेचे उद्धिष्ट, विविध आंदोलन याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री.गुट्टे म्हणालेत संघटन ही काळजी गरज लक्षात घेता वंजारी समाजाने संघटित होऊन, अन्यायाविरोधात आक्रमण पणे सामना करणं आवश्यक आहे. युवकांनी व्यसनाच्या अधीन न जाता चांगली नोकरी, उद्योगधंदा करत आई-वडिलांची व समाजाची सेवा करात आदर्श व्यक्तिमत्व निर्माण करावे असेही मत व्यक्त केले.

श्री.चैत्यन्य जायभाये यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांना उद्देशुन स्वतःची आर्थिक व सामाजिक प्रगती करत समाजाची प्रगतीकडे विशेष लक्ष द्यावे असे सूचित केले. श्री.गजानन आंधळे यांनी स्वतःचे उदाहरण देत एका वंजारी माणसाने आदर्श उद्योजक होण्याबाबत नियमावली समजून सांगितली. श्री.रवि सानप यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता संघटनेद्वारे कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल याचे सविस्तर माहिती दिली. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती श्री.सानप यांनी सादर केली. या योजनांचा लाभ समाजातील घटकांना देण्यासाठी संघटनेद्वारे शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना पदाधिकारींना केली.
श्री.नितीन आंधळे यांनी महाज्योति आंदोलनाबाबत माहिती सादर केली. संघटनेचे जुने पदाधिकारी ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख श्री.विजय भाऊ सांगळे यांनी संघटनेचे महत्व समजून सांगत संघटनेची माहिती सादर केली.

बैठकीचे सूत्रसंचालन व प्रास्तविक श्री.अर्जुन मुंढे यांनी केले, यावेळी श्री.मुंढे यांनी पदाधिकारींची ओळख, संघटनेची ओळख, कार्यबाबत माहिती सादर केली. व आभार प्रदर्शन श्री.प्रसाद बोडके यांनी केले.

बैठकीदरम्यान संस्थापक अध्यक्ष श्री.धनराज दादा गुट्टे यांनी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी श्री.रवि आण्णा सानप यांची फेरनिवडची घोषणा केली.

तसेच श्री.सानप यांनी नाशिक जिल्हाध्यक्ष पदी श्री.अर्जुन भाऊ मुंढे व ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी श्री.प्रसाद भाऊ बोडके यांची फेरनिवड जाहीर केली.

श्री.अर्जुन मुंढे व श्री.प्रसाद बोडके यांनी नाशिक जिल्हा शहर व ग्रामीण कार्यकारणी जाहीर करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

बैठकीच्या शेवटी संघटनेचे संपर्कप्रमुख कै. सुनील तात्या सानप यांच्या कार्याचे स्मरण करत भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली.

अतिशय अभ्यासपूर्वक व शिस्तबद्ध पद्धतीने बैठकीचे आयोजन केल्याबद्दल संघटनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारींना नाशिक जिल्हा पदाधिकारींची विशेष कौतुक केले.

अखिल भारतीय वंजारी युवा संघटन
नाशिक जिल्हा नवनियुक्त कार्यकारणी – २०२२

▪️उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष
श्री.रवि (आण्णा) सानप

▪️जिल्हाध्यक्ष
श्री.अर्जुन भाऊ मुंढे

▪️जिल्हाध्यक्ष (ग्रामीण)
श्री.प्रसाद भाऊ बोडके

▪️जिल्हा कार्याध्यक्ष नाशिक शहर
श्री.शरद नाना काळे
▪️जिल्हा उपाध्यक्ष नाशिक शहर
श्री.सुनील भाऊ घुगे
▪️जिल्हा सरचिटणीस नाशिक शहर
श्री.विजय भाऊ गिते
▪️जिल्हा उपाध्यक्ष नाशिक ग्रामीण
श्री.रोशन भाऊ बोडके
▪️जिल्हा सरचिटणीस नाशिक ग्रा.
श्री.निलेश भाऊ सानप
▪️जिल्हा संघटक नाशिक ग्रामीण
श्रीप्रमोद भाऊ सानप
▪️सिन्नर तालुका अध्यक्ष
श्री.उमेश भाऊ बोडके
▪️सिन्नर तालुका उपाध्यक्ष
श्री.मदन भाऊ गिते
▪️दिंडोरी तालुका अध्यक्ष
श्री.रिंकेश भाऊ गायकवाड
▪️जिल्हा सरचिटणीस
श्री.गणपत बोडके
▪️सरचिटणीस नाशिक ग्रामीण
श्री.ज्ञानेश्वर भाऊ सांगळे
▪️नवीन नाशिक अध्यक्ष
श्री.सागर भाऊ आव्हाड
▪️निफाड तालुका उपाध्यक्ष
श्री.सुनील भाऊ सानप
▪️नाशिक शहर संघटक
श्री.सचिन भाऊ गिते
▪️नाशिक शहर सरचिटणीस
श्री.निलेश भाऊ सानप
▪️नाशिक शहर संघटक
श्री.हरिकिसन भाऊ आव्हाड

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…
समाजाच्या विकासकार्यासाठी शुभेच्छा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *