एक लाख रु.लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक अटकेत; साडेचार लाख रुपयांची केली होती मागणी


दक्ष न्यूज प्रतिनिधी:पल्लवी भावसार

फिर्यादीस गुन्ह्यात मदत करून दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्याच्या मोबदल्यात साडेचार लाखाची मागणी केली. तडजोडीअंती एक लाख स्विकारणाऱ्या मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या उपनिरीक्षक योगेश ढीकले यास काल २ जून रिजी दुपारी दोनच्‍या सुमारास पोलीस स्टेशनच्या आवारात एक लाखाची लाच घेतांना रंगेहात पकडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मेहुणबारे पोलीस स्टेशनचे संशयीत आरोपी योगेश ढिकले एका गुन्ह्यात तपास अधिकारी होते. त्या गुन्ह्यांतील संशयीत आरोपीस गुरुवारी व शनिवारी पोलिस स्टेशनमध्‍ये हजेरी लावण्याचे कोर्टाचे आदेश असुन त्या गुन्ह्याचे दोषारोपत्र व हजरी कामी मदत करण्यासाठी आरोपी ढिकले याने साडेचार लाखाची मागणी केली होती. मात्र तडजोड अंती एक लाख देण्याचे ठरल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबी येथे तक्रार केली.

एसीबीने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी 2 वाजता मेहुणबारे पोस्टे सापळा रचुन ढिकले यांना पोस्टेच्या आवारात लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. एसीबीचे पोलिस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाने ही कार्यवाही केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *