पंजाब मेल ने ११० वर्ष पूर्ण केली. जाणून घेऊया इतिहास…..


दक्ष न्यूज प्रतिनिधी : भैय्यासाहेब कटारे

मुंबई ते पेशावर पंजाब मेलचे मूळ अस्पष्ट आहे. साधारण १९११ च्या खर्चाच्या अंदाज पत्रकाच्या आधारे आणि १२ ऑक्टोबर १९१२ च्या सुमारास एका संतप्त प्रवाशाने ‘दिल्लीला काही मिनिटे उशिराने पोहोचल्याबद्दल केलेल्या तक्रारीच्या आधारे, पंजाब मेलने आपला पहिला प्रवास दिनांक १ जून १९१२ रोजी बॅलार्ड पिअर मोल स्टेशन मधून केल्याचा अंदाज लावला गेला.

पंजाब मेल अधिक ग्लॅमरस अशा फ्रंटियर मेलपेक्षा १६ वर्षांनी जुना आहे. बॅलार्ड पिअर मोल स्टेशन हे प्रत्यक्षात जीआयपी रेल्वे सेवांचे केंद्र होते. पंजाब मेल, किंवा पंजाब लिमिटेड, तिला तेव्हा म्हटले जात असे, शेवटी १ जून १९१२ रोजी बाहेर पडली. सुरूवातीस, तेथे पी आणि ओ स्टीमर मेल आणि ब्रिटीश राजचे अधिकारी त्यांच्या पत्नींसह भारतीय वसाहतीत त्यांच्या पहिल्या पोस्टिंगवर आलेले असायचे. साउथॅम्प्टन आणि बॉम्बे दरम्यान स्टीमरचा प्रवास तेरा दिवस चालायचा. ब्रिटीश अधिकाऱ्यांकडे मुंबईच्या प्रवासासाठी, तसेच त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी ट्रेनने त्यांच्या अंतर्देशीय प्रवासासाठी दोन्ही एकत्रित तिकिटे असल्याने, ते उतरल्यानंतर, मद्रास, कोलकाता किंवा दिल्ली यापैकी एका ट्रेनमध्ये चढायचे.

पंजाब लिमिटेड, बॉम्बेच्या बॅलार्ड पिअर मोल स्टेशन पासून पेशावरपर्यंत जीआयपी मार्गाने, सुमारे ४७ तासांत २,४९६ किमी अंतर कापून, ठराविक मेल दिवसांवर धावत असे. ट्रेनमध्ये सहा डबे असायचे, तीन प्रवाशांसाठी आणि तीन पोस्टल वस्तू आणि टपालसाठी. तीन प्रवासी वाहून नेणाऱ्या कारची क्षमता फक्त ९६ प्रवासी इतकीच होती.

फाळणी पूर्व काळात, पंजाब लिमिटेड ही ब्रिटिश भारतातील सर्वात वेगवान ट्रेन होती. पंजाब लिमिटेडचा मार्ग मोठा प्रांत GIP ट्रॅकवरून जायचा आणि पेशावर कॅन्टोन्मेंट येथे पोहोचण्यापूर्वी इटारसी, आग्रा, दिल्ली आणि लाहोरमधून जात असे. 1914 पासून ही ट्रेन बॉम्बे व्हीटी (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून निघण्यास आणि संपण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ही ट्रेन पंजाब लिमिटेड ऐवजी पंजाब मेल म्हणून ओळखली जाऊ लागली आणि दैनंदिन सेवा बनली.

१९३० च्या मध्यापासून पंजाब मेलवर तृतीय श्रेणीचे डबे दिसू लागल्या. १९१४ मध्ये, बॉम्बे ते दिल्ली हा GIP मार्ग सुमारे १,५४१ किमी होता आणि हि ट्रेन आपला प्रवास २९ तास ३० मिनिटांत तो पूर्ण करीत असे. १९२० च्या सुरुवातीस, ह्या प्रवासाची वेळ आणखी कमी करून २७ तास १० मिनिटे करण्यात आला. १९७० मध्ये, प्रवासाची वेळ पुन्हा २९ तासांपर्यंतवाढविण्यात आली. २०११ मध्ये, पंजाब मेलचे तब्बल ५५ इंटरमीडिएट थांबे आहेत. पंजाब मेलला १९४५ मध्ये वातानुकूलित कार मिळाली.

१९६८ मध्ये, ट्रेन झाशीपर्यंत डिझेल इंजिनावर धावत असे, नंतर झाशीपासून नवी दिल्लीपर्यंत, नंतर १९७६ नंतर, फिरोजपूर पर्यंत वाढविण्यात आले. १९७० च्या उत्तरार्धात/१९८० च्या सुरुवातीस, पंजाब मेल WCAM/1 ड्युअल करंट लोकोमोटिव्हने इगतपुरी येथे डीसी ते एसी ट्रॅक्शनमध्ये बदल करून इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर भुसावळ पर्यंत चालवली जात असे.

पंजाब मेलला मुंबई आणि फिरोजपूर कॅन्टोन्मेंट दरम्यानचे १,९३० किमी अंतर ५२ थांब्यांसह पूर्ण करण्यासाठी ३२ तास आणि ३५ मिनिटे लागतात. ट्रेन इलेक्ट्रिक आहे. रेस्टॉरंट कारची जागा पँट्री कारने घेतली आहे.

२२ मार्च २०२० पासून कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान प्रवासी ट्रेन सेवा निलंबित करण्यात आल्या असल्या तरी, १.५.२०२० पासून अनलॉक झाल्यानंतर हळूहळू या सेवा विशेष गाड्या म्हणून पुन्हा सुरू करण्यात आल्या. तथापि, पंजाब मेल स्पेशलने १.१२.२०२० पासून LHB कोचसह प्रवास सुरू केला. ट्रेन सेवा दिनांक १५.११.२०२१ पासून नियमित क्रमांकाने सुरू झाली.

सध्या, पंजाब मेलमध्ये एक एसी फर्स्ट क्लाससह एसी-2 टियर, दोन एसी-2 टियर, सहा एसी-3 टियर, सहा स्लीपर क्लास, एक पॅन्ट्री कार तसेच ५ जनरल सेकंड क्लास डबे आणि एक जनरेटर व्हॅन आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *