भा.ज.यु.मोर्चा नाशिक जिल्हा तर्फे पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप



येवला: प्रतिनिधी

पंतप्रधान माननीय श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सरकारला 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात दिनांक 30 मे 2021 रोजी सेवा ही संघटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
याचं अनुषंगाने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्या हस्ते येवला शहर पोलीस स्टेशन येथे मास्क व सॅनिटायझर वाटप केल.अखिल मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले आहे. या आणीबाणीच्या स्थितीतही पोलीस जीवाचे रान करून कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करत आहे. शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी दिवसरात्र राबून पोलिसच करतात. या संसर्गाचा धोका ओळखूनही प्रत्येकजण राबत आहे.त्यामुळे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले.

सदर कार्यक्रम युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष मयुर मेघराज यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमास शहराध्यक्ष तरंग गुजराथी, भाजपा उत्तर महाराष्ट्राचे मनोजजी दिवटे,सहकारी आघाडी शहराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, आय.टी. प्रमुख प्रणव दीक्षित, मयुर रूनवाल,ललित वाखारे,हेमंत सांबर,सौरभ रूनवाल, वैष्णव पवार, श्रेयन्स चोरडीया आदी युवा पदाधिकारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *