महाराणा प्रतापसिंह यांच्या शासन परिपत्रकातील जयंती तारीखेत दुरुस्ती करणे बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

  • हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक ने दिले निवेदन

नाशिक : हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची शासन परिपत्रकात तिथी नुसार जयंती तारीख चुकलेली असल्याने ती तात्काळ बदलणे बाबत महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक तर्फे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.

शासन परिपत्रक क्रमांक जपती 22/21 प्र.क्र. 112/ कार्या.29 दिनांक- 31 डिसेंबर 2021 रोजी काढलेल्या शासन परिपत्रकात सन 2022 मध्ये राष्ट्रीय दिन साजरे करणे बाबत दिनांक 25 मे 2022 रोजी हिंदूसुर्य महाराणा प्रतापसिंह यांची जयंती दर्शवली आहे. परंतु शके कालगणनेनुसार 2022 या वर्षात ज्येष्ठ शु. तुतीया या तिथी नुसार इंग्रजी दिनांक 2 जुन 2022 ही येत असून, आपण चुकलेली दिनांक बदलून शासन स्तरावर योग्य असा बदल होऊन सुधारित परिपत्रक निर्गमित करावे ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

हे निवेदन देताना रामसिंग बावरी, बबलू परदेशी, मिथुन परदेशी, राहूल परदेशी, प्रसाद बावरी, वाल्मीक राजपूत, घनश्याम परदेशी, सुनील परदेशी, मिलिद राजपूत, जयप्रकाश गिरासे तसेच हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्सव समिती नाशिक सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *