राज्यात शेवटी निर्बंध लागू


दक्ष न्यूज : दक्ष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री उशीरापर्यंत राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर आज (शनिवारी) lockdown  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात उद्या (रविवार दि-9) मध्यरात्रीपासून राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. Covid 19 viruses maharashtra

हे आहेत नवीन निर्बंध

  • रात्री  11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी  तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. 
  • राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.
  • अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध 
  • सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक 
  • प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम, 50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही 
  • लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी 
  • अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी 
  • सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी 
  • 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद 
  • स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद 
  • हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू, रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार 
  • पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क  पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे
  • शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू
  • रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल  बंद राहणार आहे. होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे
  • नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे.  क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी. 
  • नाट्यगृह, सिनेमागृहात  संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा  बंद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *