शहरात पुन्हा भूमाफिया प्रकरण; ६.५ एकर जमीन घश्यात


दक्ष न्यूज : प्रतिनिधी

नाशिक : शहरात भूमाफियांचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा गिरणारे येथील जवळपास ६.५ एकर जमीन बळकावण्याचा व फसवणुकीचा प्रकार आनंदवल्लीतील सिंधुबाई पंढरीनाथ जाधव व त्यांची मुलगी सोनालीका जाधव यांच्यासोबत घडला आहे.

त्यात मुख्य आरोपी 1) कैलास दौलत जाधव रा.आनंदवली 2) सचिन हिरामण म्हैसधूने 3)हिरामण पुंजा म्हैसधूने दोघेही रा.यशवंतनगर 4)संजय दत्तात्रेय वडनेरे रा.कॅनडा कॉर्नर,नाशिक त्याचप्रमाणे यांच्यासोबत या कटामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे त्याचा देखील उलगडा होणे गरजेचे आहे.

सदर तक्रारदार या दोन्ही महिला असून त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आरोपींनी विश्वास संपादन केला,संगनमताने गुन्हेगारी कट रचून खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली अशाप्रकारे फसवणूक करून पैशांचा अपहार केला आहे.

(१) नाशिक शहरात भूमाफियांचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा गिरणारे येथील जवळपास ६.५ एकर जमीन बळकावण्याचा व फसवणुकीचा प्रकार आनंदवल्लीतील सिंधुबाई पंढरीनाथ जाधव व त्यांची मुलगी सोनालीका जाधव यांच्यासोबत घडला त्यात मुख्य सूत्रधार 1) कैलास दौलत जाधव रा. आनंदवली 2 ) सचिन हिरामण म्हैसधूने 3) हिरामण पुंजा म्हैसधूने दोघेही रा.यशवंतनगर 4) संजय दत्तात्रेय वडनेरे रा. कॅनडा कॉर्नर, नाशिक त्याचप्रमाणे यांच्यासोबत या कटामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे त्याचा देखील तपास होणे गरजेचे आहे.

२) सदर तक्रारदार या दोन्ही महिला असून त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन आरोपींनी विश्वास संपादन केला, संगनमताने गुन्हेगारी कट रचून खोटी व बनावट कागदपत्रे तयार केली, अशाप्रकारे फसवणूक करून पैशांचा अपहार केला आहे.

(३) जिल्हा न्यायालय नाशिक येथे फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली असून न्यायालयाने Cr.PC 202 प्रमाणे संबंधित पोलीस स्टेशनला तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. परंतु आरोपींना न्यायालयीन प्रकरणाची माहिती होताच व प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दरम्यानच्या काळात आरोपींनी तातडीने संबंधित शेतजमीन तिहाहितांना परस्पर विक्री केली आहे.

४) मात्र नाशिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी फिर्यादीचा फक्त जबाब नोंदवून तक्रार परस्पर निकाली काढत असल्याचे कळविले, नाशिक तालुका पोलीस स्टेशन यांच्या कामकाजावर संशय आल्याने तक्रारदारांनी नाशिक न्यायालयाने दिलेल्या 202 च्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय मुंबई येथे धाव घेतली आहे.

५) त्याचप्रमाणे आरोपी कैलास जाधव याने तक्रारदारांचा चांदशी येथील मोक्याचा भूखंड देखील अशाच प्रकारे फसवणूक करून गिळंकृत केला त्याचा देखील न्यायालयात वाद चालू आहे.

६) या सर्व आरोपीपासून व त्यांच्या माणसांकडून आम्हाला व आमच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्याबाबतची तक्रार गंगापूर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे

७) नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक आता तरी सदर महिलांना न्याय मिळवून देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय.

जिल्हा न्यायालय नाशिक येथे सदरील फौजदारी प्रकरण दाखल करण्यात आले असून न्यायालयाने Cr. PC 202 प्रमाणे संबधित पोलीस स्टेशनला तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे,परंतु आरोपींना न्यायालयीन प्रकरणाची माहिती होताच व प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना दरम्यानच्या काळात आरोपींनी तातडीने संबंधित शेतजमीन तिऱ्हाहितांना परस्पर विक्री केली आहे.

मात्र नाशिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी संबधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याऐवजी तक्रार परस्पर निकाली काढत असल्याचे कळविले,नाशिक तालुका पोलीस स्टेशन यांच्या कामकाजावर संशय आल्याने तक्रारदारांनी नाशिक न्यायालयाने दिलेल्या 202 च्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालय मुंबई येथे धाव घेतली आहे.

त्याचप्रमाणे आरोपी कैलास जाधव याने तक्रारदारांचा चांदशी येथील मोक्याचा भूखंड देखील अशाच प्रकारे गिळंकृत केला त्याचा देखील न्यायालयात वाद चालू आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक आता तरी सदर महिलांना न्याय मिळवून देतील का असा प्रश्न उपस्थित होतोय.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *