शिवरायांच्या सन्मानासाठी सेना खासदारांची संसदेत घोषणाबाजी


दक्ष न्युज : प्रतिनिधी

नाशिक – अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या कनार्टक मधील पुतळयाच्या विटंबनाच्या विरोधात आज शिवसेनेच्या खासदारांनी संसदेमध्ये घोषणाबाजी करत निषेध केला. छत्रपती श्री  शिवाजी   महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेला छोटीशी घटना म्हणविणा-या कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांचा यावेळी सेनेच्या खासदारांनी जोरदार धिक्कार केला.

शिवसेनेच्या संसदेतील या आंदोलनामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  शिवाजी  महाराजांच्या पुतळयाची विटंबना आणि विटंबनेच्या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराव बोमय्या यांनी केलेले वादग्रस्त विधान आम्ही कधीच खपवुन घेणार नसून यापुढे कर्नाटकमध्ये असे प्रकार घडल्यास गय केली जाणार नाही असा इशारा शिवसेनेचे खा.हेमंत गोडसे यांनी संसदेत दिला आहे.

मागील आठवडयात कर्नाटक राज्यात अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती श्री  शिवाजी  महाराज यांच्या पुतळयाची समाजकंटकांनी विटंबना केली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराव बोमय्या यांनी पुतळा विटंबनाची घटना एक छोटीशी घटना असल्याचे संतापजनक वक्तव्य केले होते.

यामुळे देशभरातील विशेषतः महाराश्ट्रातील शिवप्रेमी आणि शिवसैनिकांमध्ये कर्नाटक राज्याच्या विरोधात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहेे. यातुनच आज शिवसेनेच्या खासदारांनी पुतळा विटंबनाची आणि या घटनेला शुल्लक घटना म्हनविणा-या बसवराव बोमय्या यांच्या विरोधात संसदेत जोरदार निषेध केला.

यावेळी खासदारांनी ‘नहीं सहेंगे नही सहेंगे छत्रपती श्री  शिवाजी  महाराज का अपमान नही सहेंगे’, ‘छत्रपती  शिवाजी   महाराज का अवमान करने वाली कर्नाटक सरकार के मुख्यमंत्री श्री बोमय्यी इस्तीदो दो’, मराठी जनता पर अन्याय करने वाली कर्नाटक सरकार हाय हाय’, ‘न्याय दो न्याय दो कर्नाटक की मराठी जनता को न्याय दो’ अशा आशयाचे बॅनर फडकवत घोषणाबाजी केली.

यापुढे छत्रपती श्री  शिवरायांच्या पुतळयाची विटंबना आणि बसवराव बोमय्या यांचे बेताल वक्तव्य कधीच खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी सेनेच्या खासदारांनी दिला आहे. या आंदोलनात मा.खासदार विनायक राऊत, अरविंद सावंत, हेमंतआप्पा गोडसे, धैर्यशील माने आदी शिवसेनेचे खासदार सहभागी झाले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *