नाशिककरांची चिंता वाढली


दक्ष न्युज: प्रतिनिधी

  • आफ्रिकेतून नाशिकमध्ये आलेल्या एका परदेशी नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह


नाशिक : नाशिककरांची चिंता वाढवणारी बातमी असून पश्चिम आफ्रिकेतून नाशिकमध्ये आलेल्या एका परदेशी नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू झाला आहे.


पश्चिम आफ्रिकेतील माली या शहराचा हा नागरिक रहिवासी असून एका खाजगी कंपनीत कामासाठी नाशिकमध्ये आल्याची प्राथमिक माहिती आहे.


या नागरिकाचे ओमायक्रोन स्वॅबचा नमुना पुण्याला पाठवण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *