“आधार कार्ड” नसलेल्यांना ही नाशकात मिळते लस


  • शहरातील वडाळागावातील मनपाच्यालसीकरण केंद्रावर पहिलाच उपक्रम

दक्ष न्युज : अमित कबाडे

नाशिक: ज्या नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नाही,अशांसाठी वडाळागावातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रावर शुक्रवारी विशेष मोहीम राबविण्यात आली. हा नाशिकचा अशाप्रकारचा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगितले जात आहे.

कागदपत्रे नसली तरीही कोणीही कोरोना लस मिळण्यापासून वंचित राहू नये, या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली. यात तीस लोकांना कोव्हॅक्सीन लस देण्यात आली. त्यांना महिन्याभरानंतर दुसराही डोस दिला जाईल, अशी माहिती केंद्र प्रमुख डॉ.अशोक गायकवाड यांनी दिली. निराधार, गरीब, पदपाथवर राहणारे अशा अनेकांकडे कागदपत्रे नसतात.मात्र त्यामुळे त्यांना लस मिळाली नाही तर त्यांच्यासह समाजालाही धोका उत्पन्न होऊ शकतो.

हे ध्यानी घेऊन अशा व्यक्ती शोधून त्यांना लस देण्यात आली. लस घेण्यासाठी कोविन अॅपमध्ये कागदपत्रांचा तपशील भरावा लागतो. मात्र या व्यक्तींकडे असा तपशील नसल्याने त्यांच्यासाठी वेगळी तांत्रिक व्यवस्था करण्यात आली. त्यांच्या नावाचे प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले.यावेळी डॉ. दिपीका मोरे,दराडे सिस्टर, संगिता सिस्टर व इतर सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *