नगरविकास विभागाकडून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी


  • खा.गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश

दक्ष न्युज : करणसिंग बावरी


नाशिक —
 महानगरपालिकेच्या हद्दीतील काही महत्त्वाच्या विकास कामांना विशेष निधी मिळावा यासाठी खा.हेमंत गोडसे यांच्याकडून सुरु असलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून महानगरपालिकेच्या क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेंतर्गत तब्बल पाच कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील मुख्य चौकांचे सुशोभिकरण करण्यासह रस्त्यांच्या डांबरीकरणाचे कामे होणार असनू या निधीमुळे नाशिक महानगरातील विकास कामांना निश्चितच हातभार लागणार आहे. पाच महिन्यांपूर्वी नामदार शिंदे  यांच्या नगररचना विभागाकडून शहरातील विकास कामांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मिळाला होता. आज पुन्हा नामदार शिंदे यांच्या विभागाकडून पाच कोटी रूपयांचा निधी मिळाल्याने शहरवासियांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महानगरापालिका क्षेत्रातील अनेक कामांसाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध व्हावा, यासाठी गेल्या वर्शभरापासून काही महिन्यांपासून खासदार गोडसे यांच्याकडून सततचे प्रयत्न सुरु होते. दरम्यानच्या काळात निधीच्या उपलब्धतेसाठी खासदार गोडसे यांनी दोन वेळेस नगरविकासमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची वैयक्तिक भेट घेतली होती. ठाणे,मुंबई,कल्याण या महानगरांप्रमाणेच नाशिक देखील माझे आवडते शहर असून विकासकामांसाठी मी निश्चितच भरघोस निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यावेळी ना.शिंदे यांनी खा.गोडसे यांना दिली होती. यानंतर खासदार गोडसे यांनी नगरविकास विभागाकडे सततचा पाठपुरावा करून पाच महिन्यांपूर्वी शहरातील सात विविध विकास कामांसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. शहरातील नगरसेवक तसेच शहरवासियांकडून पुन्हा खा.गोडसे यांच्याकडे निधीसाठी मागणी होवू लागली होती. मागील तीन महिन्यांपूर्वी पुन्हा खा.गोडसे यांनी ना.एकनाथ  शिंदे  यांची भेट घेत शहरातील विविध विकास कामांसाठी पुन्हा वाढीव पाच कोटी रूपयांचा निधी देण्याची आग्रही मागणी केली होती. खा.गोडसे यांची षहराच्या विकासापोटी निधीसाठीची तळमळ आणि प्रयत्न भावल्याने आज पुन्हा ना.शिंदे यांनी एक विषेश आदेष काढत पाच कोटी रूपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.  

खालील ठिकाणी होणार विकासकामे

प्रभाग क्र.23 येथील विधाते नगर येथे अभ्यासिका बांधणे व उद्यान  सुशोभिकरण  करणे (पन्नास लक्ष)
– प्रभाग क्र.2 आडगाव येथे अभ्यासिका बांधणे (पन्नास लक्ष)
– प्रभाग क्र.8 के.सी.ठाकरे उद्यान  सुशोभिकरण  करणे (पन्नास लक्ष)
– प्रभाग क्र.28 सिध्दटेक येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे (पन्नास लक्ष)

– प्रभाग क्र.26 वेणुनगर गार्डन सर्वे 29/1 खुटवडनगर यामध्ये जिमनॅस्टीक हॉल बांधणे व सुषोभिकरण करणे (पन्नास लक्ष)
– प्रभाग क्र.26 गोरेबाबा मंदिर परिसरात जिमनॅषियम हॉल बांधणे (पन्नास लक्ष)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *