स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांना गती द्या- खा.गोडसे

दक्ष न्युज : अमित कबाडे

नाशिक – स्मार्ट सिटी अंतर्गत गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आज खा.हेमंत गोडसे यांनी प्रशासनाकडून आढावा घेतला. शासनाने घालून दिलेल्या मुदतीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे पूर्ण का झाली नाहीत असा सवाल यावेळी खासदार गोडसे यांनी प्रशासनाला केला. कोरोनामुळे दीड वर्षे प्रकल्पांची कामे ठप्प झाल्याने कामे पूर्ण होऊ शकली नाहीत असे स्पष्टीकरण प्रशासनाने खासदार गोडसे यांना दिले .यापुढे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांत हलगर्जीपणा होता कामा नये तसेच शासनाने दिलेल्या वाढीव मुदतीच्या आत प्रकल्पांची कामे पूर्ण झालीच पाहिजे अशा सूचना खा.गोडसे यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत.

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या शहरातील चोपन्न विविध प्रकल्पांची कामे अतिशय संथ गतीने सुरू असल्याचा सुर खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे शहरातील विविध संस्था तसेच शहरवासीयांकडून व्यक्त होत होता. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा दर्जा तपासला जात नाही. प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू आहेत. यामुळे सदर प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होणार नसल्याची चिन्हे निर्माण झाली असून प्रकल्पांच्या किमतीत मोठया प्रमाणावर वाढ होणार असल्याच्या तक्रारी शहरवासियांनी खा.गोडसे यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत आज स्मार्ट  सिटी अधिर्कायांची विशेष बैठक घेतली यावेळी स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांच्यासह असंख्य अधिकारी उपस्थित होते.

खासदार गोडसे यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत शहरांमध्ये सुरू असलेल्या 54 प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीविशयीची माहिती स्मार्ट सिटी प्रशासनाकडून घेतली.स्मार्ट सिटीसाठी शासनाकडून सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून शहरांमध्ये 54 प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या कामांचा स्मार्ट सिटी, पीपीपी मोड, कन्हर्जन आणि सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) या चार वर्गांमध्ये समावेश  करण्यात आलेला आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत 19 कामे असून त्यापैकी सात कामे पूर्ण झाली आहे. 8 कामे प्रगती पथावर असून 5 कामे डीपीआर स्थरावर आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) मोड अंतर्गत 9 कामांचा समावेश असून पैकी 2 कामे पूर्ण झाली आहेत. 4 कामे प्रगतीपथावर असून 3 कामे डीपीआर स्थरावर आहेत. कन्व्हर्जन गटात एकूण 19 कामांचा  समावेश  असून 11 कामे पूर्ण झाली आहेत.

7 कामे प्रगतीपथावर असून एक प्रकल्प डीपीआर स्थरावर आहे. सामाजिक दायित्व गटात 5 कामांचा  समावेश   असून 4 कामे पूर्ण झाली आहेत तर 1 काम डीपीआर स्थरावर असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिली आहे. देशभरात नाशिक शहराची ओळख श्रीरामाची भुमी अशी असल्याने राम-लक्ष्मण-सिता यांची भव्यदिव्य प्रतिकृती रामकुंड परिसरात असणे अत्यंत आवश्यक  असल्याचे यावेळी खा.गोडसे यांनी स्पश्ट केले.

यापुढे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामांत हलगर्जीपणा होता कामा नये तसेच शासनाने दिलेल्या वाढीव मदतीच्या आत प्रकल्पांची कामे पूर्ण झालीच पाहिजे अशा सूचना खा.गोडसे यांनी यावेळी प्रशासनाला केल्या आहेत.


Hon’ble Shri. Hemant Tukaram GodseMember of Parliament Nashik.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *