संमेलनात होणारे वाद-विवाद टाळून संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करा- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील


  • नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ ; गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा मी प्रयत्न करेल -ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील

नाशिक,दि.३ डिसेंबर :-

मराठी साहित्यासाठी काम करताना या गोदेच्या काठावर अधिक सुंदर लिहीण्याचा प्रयत्न करेल असे प्रतिपादन ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले आहे. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय साहित्य मंडळाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नाॅलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन मला एका चमत्कारा सारखे वाटते. पावसाचा व्यत्यय असतांना वाघासारखे पुढे येऊन छगन भुजबळ यांनी दिवस रात्र काम करून हे सर्व संमेलन स्थळ उभं केलं. यामागे कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या भूमीची प्रेरणा आहे. नाशिक हे माझ्यासाठी अजिंठा आणि वेरूळ आहे तात्यासाहेब यांचे घर हे माझ्यासाठी अजिंठा तर कानेटकरांचे घर हे वेरूळ असल्याचे सांगत यामध्ये पानिपत ही कादंबरी महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले.

काळाराम मंदिर सत्याग्रह, दादासाहेब गायकवाड यांचे कार्य या नाशिक नगरीत होत. नाशिक या भूमीत अनेक महत्वाचे व्यक्तिमत्व घडले असल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.यारी आणि दिलदारी यात नाशिकचा हात कोणी धरू शकत नाही.राजकीय दृष्ट्या देखील अतिशय महत्त्वाची भूमी असून राजकारणातही मैत्री निभावणारे राजकीय व्यक्ती आहे.साहित्याच्या दृष्टीकोनातून रत्नाची खान आहे. नाशिकमध्ये साहित्याची परंपरा अतिशय मोठी आहे.

कोरोनाच्या काळात अनेक कवी लेखकांचे दुःखद निधन झाले याच दुःख वाटते. शिवरायांच्या स्मृती आपल्याला जतन करायला हव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्रसाठी, मराठीमाती साठी अण्णाभाऊ साठे यांच्यासारखे शाहीर, अनेक साहित्यिक, लेखक यांनी रस्त्यावर येऊन जो संघर्ष उभा केला होता त्याची आठवण देखील संमेलनाचे उद्घाटक विश्वास पाटील यांनी यावेळी मांडली.

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, साहित्य संमेलन घ्यावे की नाही यावर प्रत्येक वर्षी प्रश्न उपस्थित केले जातात. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, राजकीय पक्षांच्या नावावर, भोंदू बाबांच्या नावावर जर लोक एकत्र येत असतील तर मराठी भाषेसाठी एकत्र आले तर काय हरकत आहे असा सवाल देखील यावेळी विश्वास पाटील यांनी उपस्थित केला.

  • जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख इतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेले जावेद अख्तर म्हणाले की, मराठी साहित्याच्या दरबारात येण्याची संधी मिळाली ही अतिशय आनंदाची बाब असून या मातीला मी प्रणाम करतो. मातृभाषा आपल्याला भूतकाळातून वर्तमानात आनते असे मत देखील त्यांनी यावेळी मांडले

यावेळी ते म्हणाले की, लेखक जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही बाब समाजातील काही लोकांना रुचत नाही हे योग्य नाही. आपलं परखड मत समाजापुढे मांडल्यावर पूर्वी काही लोक दोषी मानत होते. आता तर देशद्रोही ठरविले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.साहित्य आणि राजकारण याच नातं काय हा प्रश्न नेहमीच उभा राहतो. मात्र साहित्य आणि राजकारण याच घनिष्ठ नातं आहे.

पुढे प्रमुख पाहुणे जावेद अख्तर म्हणाले की लोकशाही व्यवस्थेसाठी कुठलाही बंधनात न वावरनारे अतिशय महत्वाचे असुन साहित्यिकांनी राजकारणाच्या दबावाला बळी पडू नये. त्यांनी मुक्तपणे साहित्य लिहावे असे मत त्यांनी व्यक्त केले. कुठल्याही कवि लेखककावर अन्याय होत असेल तर सर्व लेखकांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे.

जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख
जो बात कहते डरते है सब तु वो बात लिख
इतनी अंधेरी न थी रात पहले लिख- जावेद अख्तर असे म्हणत जावेद अख्तर यांनी लेखकांना निर्भीडपणे लिहीण्यासाठी साद घातली.

  • मराठी साहित्य संमेलनात होणारे वाद टाळून, संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे- प्रा. कौतिकराव ठाले-पाटील

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर येऊ शकले नाही याची उणीव भासत आहे. साहित्य महामंडळाने संहिता बदलली त्यातून नवीन अध्यक्ष निवडण्यात आले. या संमेलनात अध्यक्ष हजर राहू शकले यांनी यामुळे संमेलनास वेगळी किनार लाभली. त्यामुळे यापुढे अध्यक्ष निवडीबाबत विचार करावा लागणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, तरुण साहित्यिकांना बोलत करणं हा साहित्य संमेलनाचा प्रयत्न आहे.समाज स्थितीशील राहिला नाही गतिशील झाला आहे. हळुवार का होईना बदल होत आहे हा बदल समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनाच्या साहित्यिक मेजवाणीचा लाभ नागरिकांना घ्यावा विविध कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच नाशिकचं संमेलन इतकं वेठीस धरलं गेलं त्याचा मला खेद वाटतो. आपल्याला असलेल्या प्रश्नांची उत्तरे चर्चेतून मिळू शकतात. त्यामुळे वादविवाद टाळावे असे त्यांनी यावेळी सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *