हिंदुहृदयसम्राट ग्रुप ने केले रेकॉर्ड ब्रेक 162 पिशव्या रक्तदान


नाशिक: विशेष प्रतिनिधी

कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या संकटात हिंदूहृदय सम्राट ग्रुपच्या वतीने सामाजिक भान राखत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती दिनी नाशिक ब्लड बँक येथे शुक्रवार दि.28 मे रोजी दिवसभरात तब्बल 162 पिशव्या रक्तसंकलन करीत आपले कर्तव्य पार पाडून कोरोना महामारीच्या काळात आरोग्य यंत्रणेला आपला हातभार लावला आहे.
सद्या देशासह, राज्यात, जिल्हयात व नाशिक शहरात बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या मुळे प्रत्यके गोष्टीची टंचाई निर्माण होत आहे. यात रक्ताची टंचाई मोठया प्रमाणावर भासत आहे. याच कारणामुळे हिंदुहृदयसम्राट ग्रुप स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आपली सामाजिक बांधिलकी समजून कोरोना महामारीच्या काळात रक्ताची कमी पडू नये यासाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजन केले होते.

या शिबिराचे उदघाटन आपल्या नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर साहेब यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाले. तसेच या वेळी स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्या नंतर रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात शेकडो युवकांनी सहभाग नोंदवत रक्तदान केले. या मुळे या भव्य रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात हिंदुहृदयसम्राट ग्रुपचे सर्व सदस्य, मित्र परिवार, रक्तदान करणारे देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात नाशिक ब्लडबँकचे डॉक्टर सह संपूर्ण टीमचे अमूल्य सहकार्य लाभले. हे शिबीर कोरोनाकाळात शासनाने लागू केलेलं सर्व नियम पाळून करण्यात आले. उपस्थित सर्वांनी सोशल डिस्टन्स राखून, मास्क तोंडावर लावत हा कार्यक्रम पार पाडला. यावेळी पोलीस प्रशासन व पत्रकार मित्रांनी कार्यक्रमास चांगले सहकार्य केले.


One thought on “हिंदुहृदयसम्राट ग्रुप ने केले रेकॉर्ड ब्रेक 162 पिशव्या रक्तदान

  • May 28, 2021 at 4:50 pm
    Permalink

    सामाजिक भान ठेवणारे हिंदुहृदयसम्राट ग्रुप

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *