समाजपयोगी कार्य करणाऱ्या समाजमंदिरांची भाडेवाढ करु नये- खा. हेमंत गोडसे


  •  खासदार गोडसे यांच्या शिष्टमंडळाची शरद पवार यांच्याकडे मागणी

नाशिक : करणसिंग बावरी

महानगरपालिकेने विविध सेवाभावी संस्थांना समाजपयोगी कामासाठी शहरातील समाजमंदिरे , जागा माफकदराने भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत . रेडीरेकनर दरानुसार समाजमंदिरांचे भाडे वाढविण्याचा निर्णय मनपा प्रशासनाच्या विचारधीन असल्याचे सेवाभावी संस्थेच्या पदाधिकार्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे . यातूनच आज खासदार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली .

लोकाभिमुख कार्य करणा – या समाजमंदिराच्या माफक भाडयाच्या दरात कोणतीही दरवाढ करु नये , अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने पवार यांच्याकडे केली आहे . समाजमंदिरांचा वापर जर समाजपयोगी कामांसाठी होत असेल तर त्यांना पूर्वीप्रमाणेच माफक भाडे असावे ही मागणी योग्य असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री दिली आहे . आणि राज्याचे सेक्रेटरी यांच्यासमवेत विशेष बैठक घेवू अशी ग्वाही पवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे.

शहरातील अनेक भूखंड महानगरपालिकेने समाज उपयोगी कार्य करणा – या सेवाभावी संस्थांना माफक दराने भाडेतत्त्वावर दिलेली आहेत . नगरसेवक , आमदार , खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या निधीतून भूखंडावर संस्थांनी समाज मंदिरे उभारली आहेत . या समाज मंदिरात मध्ये व्यायाम शाळा , अभ्यासिका आदी सुरु करण्यात आलेल्या असून वृद्धांच्या विरंगुळ्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत . सेवाभावी संस्थांकडून समाज मंदिरांचा उपयोग समाजउपयोगी उपक्रमांसाठी केला जातो . महानगरपालिकेकडून मोफत दरात भाडेतत्त्वावर भूखंड मिळत असल्याने विविध समाजसेवी संस्था समाज मंदिरे बांधून समाजउपयोगी कार्य आहेत . परंतु आता रेडिनेकनर दरानुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय महापालिकेच्या विचाराधीन आहे . सदर भाडे परवडणारे नसल्याने सेवाभावी संस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे . यातूनच आज खासदार हेमंत गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी संस्थेच्या पदाधिका – यांनी शरद पवार यांची शहरातील हॉटेल इमरान पार्क भेट घेतली .

शहरातील समाजमंदिरांमधून चांगल्या प्रकारे समाज कार्य होत आहे . समाज मंदिरांमधील अभ्यासिका आणि व्यायाम शाळा यांचा लाभ शहरातील हजारो विद्यार्थ्यांना होत आहे . सायंकाळच्या वेळेस परिसरातील वृद्ध नागरिकांचा समाज मंदिराच्या आवारात विरंगुळा होतो . महानगरपालिका प्रशासनाने रेडीरेकनरच्या दरानुसार भाड्यत वाढ करण्याचे निश्चित केल्यास समाजसेवी संस्थांना समाजमंदिर बंद केल्याशिवाय पर्याय नाही . यामुळे शहरातील हजारो तरुणांचे तसेच वृद्धांची मोठी कुचंबना होणार असून या प्रश्नाची व्याप्ती राज्यभर आहे . याचा सारासार विचार करत कायद्यात बदल करून रेडीरेकनरनुसार होणारी भाडे दरवाढ थांबवावी , अशी आग्रही मागणी शिष्ठमंडळातील पदाधिका – यांनी पवार यांच्याकडे केली आहे . समाजमंदिरांच्या भाडेवाढीचा विषय मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राज्याचे सेक्रेटरी सिताराम कुंटे यांच्याकडे विशेष बैठक आयोजित करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिली आहे . या शिष्टमंडळात माजी उपमहापौर मनीष बस्ते , नगरसेवक तानाजी जायभावे , शिवाजी गांगुर्डे , राजीव ठाकरे , रंजन ठाकरे , घोरपडे आदी मान्यवर सहभागी झाले होते .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *