वीजदर सवलत मिळण्यासाठी यंत्रमाग घटकांना तीन महिन्यांची मुदतवाढ



प्रतिनिधी –  अभिजीत देवकर

नाशिक: कोरोनानंतर अवकळा आलेल्या आणि मंदीच्या खाईत सापडलेल्या यंत्रमाग उद्योगाला सावरण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. त्याअंतर्गत या घटकांना जाहीर केलेली वीजदर सवलत मिळवण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्तांनी तसे आदेश दिले आहेत.

राज्यात वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीज दरात सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना नोंदणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने यंत्रमाग घटाकांनी नोंदणी करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

वस्त्रोद्योग धोरणांतर्गत 25 फेब्रुवारी 2021 अन्वये 27 अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांसाठी वीजदर सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या मुदतवाढीदरम्यान बहुतांश यंत्रमाग घटकांनी नोंदणी केली नसल्याने अशा उद्योगांना नोंदणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता मुदत वाढ देण्यात आली आहे. त्याकरिता संबंधित यंत्रमाग घटकांनी दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे, असे वस्त्रोद्योग विभागाच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कळविले आहे.

कोरोनानंतर मालेगावातील यंत्रमाग उद्योग सुरू झाला आहे. मात्र, बाजारपेठेत मागणीच नसल्याने या उद्योगावर मंदीचे सावट आले आहे. तयार कापडाला उठाव नाही. त्यामुळे अनेक कारखाने बेमुदत बंद होते. या बंदचा सर्वात जास्त फटका कारखान्यात काम करणाऱ्यांना कामगारांना बसला. मालेगावात दररोज सुमारे दीड कोटी मीटर कापड तयार केले जाते. मात्र, तयार कापडाला उठाव नाही. सुताच्या भावात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कारखाने चालवणे कठीण झाले आहे. शासनाने वीज बिलात सवलत द्यावी. तसेच कच्च्या मालावरील जीएसटी कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी यंत्रमाग असोशिएशनने केली होती. तसेच इतर भागातील यंत्रमाग धारकांनी ही मागणी केली होती. हे ध्यानात घेता सरकारने वीज दरात सवलत लागू केली आहे.

वस्त्रोद्योग धोरण 2018-2023 अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना वीज दरात सवलत लागू करण्यात आली आहे. वीजदर सवलतीस पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना नोंदणी करण्यासाठी पुढील तीन महिन्यांकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने यंत्रमाग घटाकांनी नोंदणी करून या सवलतीचा लाभ घ्यावा.
शीतल तेली-उगले, आयुक्त, वस्त्रोद्योग विभाग


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *