नादुरुस्त टिप्परला आयशरची धडक, दोघे जागीच ठार

औरंगाबाद: अभिजीत देवकर

पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेऊन हा आयशर बारामतीकडे निघाला होता. धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली. या भीषण अपघातात कल्पनाबाई इमाजी पवार, प्रशांत विठ्ठल वाघ, हे दोघे जागीच ठार झाले.

सिल्लोड तालुक्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त टिप्परला आयशरने पाठीमागून धडक दिल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात सिल्लोड-कन्नड रस्त्यावरील धानोरा फाट्याजवळ (Accident in Sillod) पहाटेच्या सुमारास झाला. अपघातात मरण पावलेले दोघेही सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) माळसिरस येथील रहिवासी आहेत.

  • ऊसतोड कामगारांनी भरलेला होता आयशर

पाचोरा येथून काही ऊसतोड कामगारांना घेऊन हा आयशर बारामतीकडे निघाला होता. धानोरा फाट्याजवळ रस्त्यावर त्याने नादुरुस्त टिप्परला मागून धडक दिली. या भीषण अपघातात कल्पनाबाई इमाजी पवार, प्रशांत विठ्ठल वाघ, हे दोघे जागीच ठार झाले. तर अन्य चार जण जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की आजूबाजूचे लोक मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी जमा झाले. दरम्यान जखमींना सिल्लोडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *