पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी देशवासीयांशी साधणार संवाद
नवी दिल्ली: करणसिंग बावरी
देशात कोरोनाविरुद्ध महायुद्ध सुरु आहे. यातच काल देशाने शंभर कोटी जनतेला लसीचा टप्पा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांची संवाद साधणार आहे, आज सकाळी दहा वाजता ते आपल्या दिल्लीतील कार्यालयातून चित्रफितीद्वारे संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत.
संबोधन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष घालतात व देशासमोर मांडतात याकडे संपूर्ण देशाचे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.