राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे नाशिकमध्ये आयोजन; शनिवारपासून रंगणार सामने

नाशिक: अभिजीत देवकर

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे येत्या शनिवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील महाजे येथे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 40 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

नाशिकः राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे येत्या शनिवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील महाजे येथे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 40 संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन, नाशिक जिल्हा महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन आणि डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दिंडोरी तालुक्यातील महाजे येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार पासून ही स्पर्धा होत असून देशातील विविध राज्यांतील संघ यात सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष डी. बी. साळुंके यांनी दिली आहे. या वेळी प्राचार्य दीपक मोकल ,जनरल सेक्रेटरी,सरपंच महाजे वसंत रंगनाथ भोये, योगेंद्र दोरकर,राज्य संघटक शरद कदम उपस्थित होते. दुर्गम भागात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गुजरात, दिव दमण, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मणिपूर, महाराष्ट्र, गोवा येथून येणाऱ्या खेळाडूंच्या 40 संघाची राहण्याची व्यवस्था ननाशी येथील आश्रमशाळेत केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम क्रमांक 21 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक 15 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक 11 हजार आणि सन्मानचिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, खा. हिना गावित , राष्ट्रीय अध्यक्ष विपीन चहल, महासचिव विक्रम सिंह उपस्थित होणार आहे. या स्पर्धेचे तयारी पूर्णत्वास गेली आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या खेळाडूंची चोख बडदास्त ठेवण्यात येईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे येत्या शनिवारपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील महाजे येथे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागात पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेसाठी राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, गुजरात, दिव दमण, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बंगाल, ओरिसा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, मणिपूर, महाराष्ट्र, गोवा येथील संघ सहभागी होणार आहेत.
– डी. बी. साळुंके, महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *