‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नाट्यगृहे सुरु करण्याची नियमावली जाहीर



नाशिक: प्रतिनिधी: अभिजीत देवकर

राज्यातील नाट्यगृह व चित्रपटगृह २२ ऑक्टोबरनंतर नियम पाळून खुले करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आता त्यासाठी राज्य सरकारने यासंदर्भातील कार्यपद्धती आणि नियमांचा अध्यादेश काढला आहे.

नाट्यगृहे पुन्हा सुरू करण्याबाबतची प्रमाणित कार्यपद्धती :

● प्रतिबंधित क्षेत्रात नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही.

● महसूल, वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या प्रचलित मार्गदर्शक तत्वांनुसार नाट्यगृहांचे नियमन होणार.

● स्थानिक करोना परिस्थिती विचारात घेऊन जिल्हाधिकारी संबंधित शासकीय यंत्रणांशी विचारविनिमय करून निर्बंधांमध्ये वाढ करू शकतील.

● सुरक्षित अंतराबाबतच्या मानकांनुसार प्रवेशद्वारे व समुचित ठिकाणी जमिनीवर खुणा आखाव्या लागणार.

● नेमलेल्या व्यक्तींना पडदा, पडद्यामागील वस्तू आदी हाताळण्याची परवानगी देण्यात येईल.

● नाट्य कलाकार आणि कर्मचारी यांनी नियमितपणे त्यांची स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

● सर्व देखाव्यांची व कलाकारांसाठी असलेल्या कक्षांची दररोज फवारणी करण्यात यावी.

● स्वच्छतागृहांची वेळेवर स्वच्छता केल्याची खातरजमा करावी.

● मास्कचा वापर बंधनकारक, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, अतिथींना कलाकारांच्या कक्षात परवानगी दिली जाणार नाही.

● प्रेक्षागाराबाहेर, सामाईक क्षेत्रांमध्ये आणि प्रतीक्षा क्षेत्रांमध्ये नेहमी किमान सहा फूट इतके पर्याप्त सुरक्षित अंतर राखावे.

● गर्दी होऊ नये म्हणून लोकांना अंतर ठेवून रांगेन बाहेर सोडले जावे.

● नाट्यगृहांचा वापर त्यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्यात येणार नाही.

● सर्व वातानुकूल उपकरणांचे तापमान २४ ते ३० अंश सेल्सिअस या मर्यादेत असले पाहिजे.

● सभागृहात प्रवेश देताना थर्मल टेस्टद्वारे प्रेक्षकांच्या शारीरिक तापमानाची चाचणी घेऊनच प्रवेश देणे ही सभागृह व्यवस्थापनाची, आयोजकांची जबाबदारी.

● बंदिस्त सभागृहाच्या एकुण बैठक क्षमतेच्या ५० टक्के इतक्या मर्यादेत प्रेक्षक संख्येची मुभा.

● बंदिस्त सभागृहातील व्यासपीठ व प्रेक्षकंमध्ये शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक अंतर राखणे (किमान ६ फूट) आवश्यक राहील.

● बालकलाकारां व्यतिरिक्त सर्व कलाकार, आयोजक व साह्यभूत कर्मचारी वर्गाचे संपूर्ण कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले असणे आवश्यक असेल.

● प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंध लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती सुरक्षित अशी दर्शवलेली असणे आवश्यक राहील…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *