नाशकात पुन्हा धारधार शस्त्राने खून

नाशिक: दक्ष प्रतिनिधी

जुने नाशिकमधील दूधबाजार परिसरात आज सायंकाळी एकाने धारदार शस्त्राने वार करून दुसर्‍याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नितीन उर्फ सोनू बालाजी गायकवाड रा. भारत नगर असे खून झालेल्याचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दूध बाजार पोलीस चौकीजवळ दोन तरुण नशा करत होते. नशा करताना त्यांच्यात वाद झाले. त्यात एकाने नितीनवर धारदार शस्त्राने वार करत ठार केले. या घटनेनंतर संशयित पळून गेला. जखमी अवस्थेत नितीनला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करत त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *