‘मी जबाबदार नाशिककर’ या कल्पने अंतर्गत लसीकरण जनजागृती मोहीम


  • शहरातील नृत्य कलाकारांनी एकत्र येऊन COVID लसीकरण करून घेण्यासाठी नाशिककरांना दिला संदेश

नाशिक: करणसिंग पवार

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरात विविध लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ‘मी जबाबदार नाशिककर’ या कल्पने अंतर्गत आज शहरातील काही नृत्य कलाकारांनी एकत्र येऊन COVID लसीकरण करून घेण्यासाठी नाशिककरांना संदेश दिला. जवळपास 35 कलाकार हे विविध डान्स अकॅडमी मधून एकत्र आले होते.

COVID लसीचा पहिला डोस घ्यावा व तो घेतला असल्यास दुसरा डोस घेण्यासही वेळ करू नये, गरोदर माता व स्तनदा माता यांच्या साठी देखील विविध लसीकरण अत्यंत सुरक्षित आहे, 18 वर्षे व त्यावरील सर्व हे COVID लसीकरणासाठी पात्र आहेत, तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणजे 100% लसीकरण केलेले नाशिककर असे विविध संदेश त्यांनी या पथनाट्यातून दिले.

त्रिमूर्ती चौक, सातपूर चौक, रविवार कारंजा व पंचवटी येथे त्यांनी त्यांची कला सादर केली व लोकांना संदेश दिला. अशी नाविन्यपूर्ण गोष्ट घडत असल्यामुळे रस्त्यांवर बघ्यांची गर्दी जमली होती. नृत्य कलाकारांनी त्यांना सोशल डिस्टंसिंग, मास्क घालने, सॅनिटायझर वापरणे व हात स्वच्छ धुण्याचे संदेशही दिले.

या कार्यक्रमादरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या नोडल ऑफिसर डॉ. अजीता साळुंखे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.पर्वणी लाड, श्रीवर्धन मालपुरे- स्वयंसेवक, अभिजीत कांबळे, १०१ crew dance academy, DKD dance crew व इतर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सेव द चिल्ड्रन या संस्थेने प्रामुख्याने मदत केली.

एकूण काय तर कोरोना अजून गेलेला नाही व ते ध्यानात ठेवून आपण COVID योग्य वागणूक करावी व स्वतःला आणि परिवाराला सुरक्षित ठेवावे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *