राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी अभिजीत देवकर

⚡ मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

☑️ दोन दिवसांत राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने दिवसाच्या तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

👀 राज्यातून मोसमी वारे निघून गेले आहेत. मात्र, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचा परिणाम राज्यात काही ठिकाणी होत आहे.

🌦️ मराठवाड्यातील परभणी आणि विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा आदी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाल.

👉 तर विदर्भातील चंद्रपूर, अकोला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

📍 औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, तर मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, नगर आदी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *