हिंदुहृदयसम्राट ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन


कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या संकटात आपल्या नाशिक शहरात येत्या २८ मे २०२१ रोजी हिंदूहृदय सम्राट ग्रुपच्या वतीने नाशिक ब्लड बँक SSK हॉटेल समोर तिडके कॉलनी नाशिक येथे सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

सद्या देशासह, राज्यात, जिल्हयात व नाशिक शहरात बिकट अवस्था निर्माण झाली आहे. या मुळे प्रत्यके गोष्टीची टंचाई निर्माण होत आहे. यात रक्ताची टंचाई मोठया प्रमाणावर भासत आहे. याच कारणामुळे हिंदुहृदयसम्राट ग्रुप स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत आपली सामाजिक बांधिलकी समजून कोरोना महामारीच्या काळात रक्ताची कमी पडू नये यासाठी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करीत आहे.

या शिबिराचे उदघाटन आपल्या नाशिक परिक्षेत्राचे माजी पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तसेच अनेक मान्यवर या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत. हा कोणताही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम नसून समाजाप्रती एक कर्तव्य समजून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. असे सर्व ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले आहे.

या रक्तदान शिबिरात सर्व नाशिकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन हिंदुहृदयसम्राट ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. सदर शिबिरात रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढील लिंक द्वारे गुगल फ्रॉम भरून द्यावा. https://forms.gle/swq78beMJztRV74W6

व या समजा उपयोगी कार्यमध्ये आपला सहभाग नोंदवून इतिहासाचे साक्षीदार व्हा.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा- 9511944111 / 7028029999 / 9823205171


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *