राज्यात पुन्हा येणाऱ्या चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नाशिक : प्रतिनिधी (अभिजीत देवकर)

पुढील चार दिवस राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत् मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज अंदमान आणि निकोबारमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नटकातील किनारपट्टी भाग, केरळ आणि पुद्दुचेरी येथील माहे येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे.

या सर्व भागात 9 ऑक्टोबरला देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. या राज्यांव्यतिरिक्त, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही 10 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसानं झोडपलं आहे. पुण्यासह ठाणे आणि घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *